Home / लेख / मेटाने आणला ‘स्मार्ट’ चष्मा; करणार स्मार्टफोनचे काम, डोळ्यासमोरच दिसेल सर्वकाही

मेटाने आणला ‘स्मार्ट’ चष्मा; करणार स्मार्टफोनचे काम, डोळ्यासमोरच दिसेल सर्वकाही

Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीने आपले नवीन स्मार्ट ग्लासेस Meta Ray-Ban Display बाजारात आणले आहेत. दावा केला...

By: Team Navakal
Meta Smart Glasses

Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीने आपले नवीन स्मार्ट ग्लासेस Meta Ray-Ban Display बाजारात आणले आहेत. दावा केला जात आहे की हा कंपनीचा पहिला असा चष्मा आहे ज्यामध्ये बिल्ट-इन स्क्रीन आहे.

आतापर्यंत ज्या गोष्टी केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून करता येत होत्या, त्या आता मेटाच्या चष्म्याच्या मदतीने करता येणार आहे.

Meta Ray-Ban Display मध्ये काय आहे खास?

या स्मार्ट ग्लासेसच्या उजव्या लेन्समध्ये एक स्क्रीन आहे, ज्यावर मेसेज, व्हिडिओ कॉल, मॅपमधील दिशानिर्देश, मेटाच्या AI सेवेचे व्हिज्युअल रिझल्ट , फोटो, संगीत नियंत्रण आणि कॅमेऱ्यासाठी डिजिटल व्ह्यूफाइंडर अशा अनेक गोष्टी दिसतील. थोडक्यात, या चष्म्याची लेन्स एखाद्या स्मार्टफोनच्या स्क्रीनसारखी काम करेल.

बोटांच्या इशाऱ्यावर काम करेल

या ग्लासेसमध्ये एक नवीन नियंत्रण प्रणाली देण्यात आली आहे. मागील मॉडेल्सप्रमाणे, युझर्स अजूनही फ्रेमवर स्वाइप करू शकतात, परंतु यामध्ये हातांच्या हावभावांना (hand gestures) मुख्य इंटरफेस बनवण्यात आले आहे. हे हावभाव मनगटावर बांधलेल्या ‘न्यूरल बँड’ (Neural Band) द्वारे ओळखले जातात.

या फीचर्सच्या मदतीने थेट हाताच्या बोटांच्या मदतीने स्वाइन करणे, वस्तू निवडणे, आवाज वाढवणे, AI व्हॉइस असिस्टंटचा वापर सारखी कामे करणे शक्य आहे.

फीचर्स

ॲप्स आणि AI प्रश्नांच्या सोप्या वापराव्यतिरिक्त या ग्लासेसमध्ये लाइव्ह कॅप्शन फीचर आहे, जे बोललेले शब्द रिअल टाइममध्ये दाखवते. यात भाषांतराचा देखील समावेश आहे. तसेच, व्हिडिओ कॉलिंग फंक्शनमुळे युझर ज्या व्यक्तीशी बोलत आहे, त्याला पाहू शकतो आणि त्याला आपला व्ह्यू पॉइंटही दाखवू शकतो.

युझर्स ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा बोलून मेसेजला उत्तर देऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस, मनगटावरील बँडमध्ये आणखी एक पर्याय जोडला जाईल, ज्यात हवेत हातवारे करून शब्द लिहिता येतील.

किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • किंमत: नवीन ग्लासेसची किंमत $799 आहे, ज्यात मनगटाचा बँडही समाविष्ट आहे.
  • उपलब्धता: हे ग्लासेस 30 सप्टेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होतील. सुरुवातीला योग्य फिटिंगसाठी ते फक्त रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील.
  • डिस्प्ले: यामध्ये 600 x 600 पिक्सल रिझोल्यूशनसह 20-अंश व्ह्यू फील्ड मिळते. याची ब्राइटनेस 30 ते 5,000 निट्सपर्यंत आहे.
  • कॅमेरा: यामध्ये 12-मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
  • बॅटरी लाइफ: ग्लासेसची बॅटरी एका चार्जवर 6 तास चालते, तर केस अतिरिक्त 30 तास चार्ज देऊ शकते (सुमारे 4 पूर्ण चार्ज). न्यूरल बँडची बॅटरी 18 तास टिकते.
  • रंग: हे ग्लासेस काळ्या आणि तपकिरी अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा एकावर हल्ला तर दुसरा मदतीला जाणार; पाकिस्तान-सौदी अरेबियामध्ये ‘संरक्षण करार’; भारताची मोठी प्रतिक्रिया

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या