Suicide – साप चावला असा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवर (Bandra-Worli Sea Link) एका व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव अमित शांतीलाल चोप्रा (Amit Shantilal Chopra) (४७) असे आहे.त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा (Imitation jewelry business)व्यवसाय होता.ते मूळचे राजस्थानचे (Rajasthan)रहिवाशी असून सध्या अंधेरी येथे पत्नी आणि मुलांसह राहत होते. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता चोप्रा यांनी टॅक्सी पकडली. वांद्रे मार्गे टॅक्सी सीलिंकवर आल्यानंतर आपल्याला साप चावला असा आरडाओरडा चोप्रा यांनी केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा (taxi)दरवाजा उघडला आणि सीलिंकवरून समुद्रात उडी मारली.
याप्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी चोप्रा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून शोधमोहीम सुरू केली.
रात्री काळोख असल्याने त्यांचा शोध लागला नाही. दुसर्या दिवशी सकाळी समुद्रात मच्छीमारीसाठी (fishermen)गेलेल्या दोन मच्छीमारांना त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला.चोप्रा यांनी मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे देखील वाचा –
तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद