SEBI Adani Hindenburg: भारतीय शेअर बाजाराचे नियामक Securities and Exchange Board of India (SEBI) ने हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन शॉर्ट-सेलरने गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या कंपन्यांवर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे.
सेबीने दोन आदेश जारी करत, अदानी समूहाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे.
SEBI च्या अहवालातील मुख्य मुद्दे
जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला होता की, अदानी समूहाने तीन कंपन्या Adicorp Enterprises, Milestone Tradelinks, आणि Rehvar Infrastructure चा वापर करून अदानी ग्रुपमधील कंपन्यांमध्ये पैसे फिरवले. मात्र, सेबीच्या तपासणीत हे आरोप निराधार ठरले आहेत.
सेबीने नमूद केले की, हे व्यवहार अशा वेळी झाले होते, जेव्हा ‘संबंधित पक्षांशी’ असे व्यवहार करणे नियमांचे उल्लंघन नव्हते. त्यानंतर नियमांमध्ये बदल करण्यात आला.
सर्व कर्जांची परतफेड झाली असून, निधीचा वापर योग्य कामासाठीच झाला होता. कोणताही गैरव्यवहार किंवा फसवणूक झालेली नाही, असे सेबीने म्हटले आहे. त्यामुळे, सेबीने अदानी समूहावरील सर्व कार्यवाही थांबवली आहे.
After an exhaustive investigation, SEBI has reaffirmed what we have always maintained, that the Hindenburg claims were baseless. Transparency and integrity have always defined the Adani Group.
— Gautam Adani (@gautam_adani) September 18, 2025
We deeply feel the pain of the investors who lost money because of this fraudulent… pic.twitter.com/8YKeEYmmp5
SEBI च्या निर्णयानंतर गौतम अदानींची प्रतिक्रिया
सेबीच्या निर्णयानंतर गौतम अदानी यांनी X (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली. “व्यापक तपासणीनंतर, सेबीने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की हिंडेनबर्गचे दावे निराधार होते. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा नेहमीच अदानी समूहाची ओळख राहिली आहे.
या फसव्या आणि प्रेरित अहवालामुळे ज्या गुंतवणूकदारांना त्रास झाला, त्यांची वेदना आम्ही जाणतो. खोटे आरोप पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. भारताच्या संस्था, भारतातील लोक आणि राष्ट्रनिर्माणाप्रती आमची बांधिलकी कायम आहे. सत्यमेव जयते! जय हिंद!” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा – Tesla Cybertruck क्रॅश टेस्टमध्ये पास, पण एका चुकीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पाहा व्हिडिओ