Home / देश-विदेश / अमेरिकेचा मोठा निर्णय! भारतीय अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द; कारण काय? जाणून घ्या

अमेरिकेचा मोठा निर्णय! भारतीय अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द; कारण काय? जाणून घ्या

India US Visa Ban: फेंटानिल (fentanyl precursors) रसायनांच्या तस्करीमध्ये कथित सहभागावरून अमेरिकेने काही भारतीय उद्योजक आणि नागरिकांचे व्हिसा रद्द केले...

By: Team Navakal
India US Visa Ban

India US Visa Ban: फेंटानिल (fentanyl precursors) रसायनांच्या तस्करीमध्ये कथित सहभागावरून अमेरिकेने काही भारतीय उद्योजक आणि नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत.तसेच काहीजणांचे व्हिसा अर्ज नाकारले आहेत.

दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाने एका निवेदनात सांगितले की, “अमेरिकन नागरिकांना धोकादायक सिंथेटिक नार्कोटिक्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.”

नेमकं काय आहे हे प्रकरण?

फेंटानिल प्रीकर्सर्स (अंमली पदार्थ) म्हणजे फेंटानिल नावाचे शक्तिशाली सिंथेटिक ओपिओइड तयार करण्यासाठी वापरली जाणारी मूळ रसायने आहेत. अमेरिकेत या औषधामुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे संकट निर्माण झाले आहे.

अमेरिकेने या प्रकरणात संबंधित भारतीय व्यक्तींची ओळख उघड केली नाही, परंतु हे व्हिसा निर्बंध या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लागू आहेत. या कुटुंबातील सदस्यांनाही आता अमेरिकेला जाण्यासाठी अपात्र मानले जाऊ शकते. भविष्यातही फेंटानिल तस्करीशी संबंधित कंपन्यांशी जोडलेल्या व्यक्तींच्या व्हिसा अर्जांची कठोर तपासणी केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

भारताला ‘ड्रग उत्पादक’ देशांच्या यादीत टाकले

या कारवाईच्या एक दिवस आधी ट्रम्प प्रशासनाने भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांना प्रमुख ड्रग तस्करी किंवा बेकायदेशीर ड्रग उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत टाकले होते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले होते की, हे देश अंमली पदार्थ आणि पूर्ववर्ती रसायनांचे उत्पादन करून किंवा त्यांच्या हालचालींना मदत करून अमेरिकेच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत आहेत.

व्हाईट हाऊसने फेंटानिलला राष्ट्रीय आपत्काल घोषित केले असून, हे रसायन 18 ते 44 वयोगटातील अमेरिकन लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या कंपन्या रडारवर

यापूर्वी जानेवारीमध्येअमेरिकेच्या न्याय विभागाने सूरत येथील Raxuter Chemicals आणि Athos Chemicals या दोन कंपन्या, तसेच Raxuter चे संस्थापक भावेश लाठिया यांच्यावर फेंटानिल रसायनांची अमेरिकेत आणि मेक्सिकोमध्ये तस्करी करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला होता.

हे देखील वाचा लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या