Home / देश-विदेश / ‘माझ्या रेस्टॉरंटने फक्त 50 रुपयांची कमाई केली’; पूरग्रस्तांसमोर कंगना रनौतने मांडले स्वतःचेच गाऱ्हाणे; होतेय टीका

‘माझ्या रेस्टॉरंटने फक्त 50 रुपयांची कमाई केली’; पूरग्रस्तांसमोर कंगना रनौतने मांडले स्वतःचेच गाऱ्हाणे; होतेय टीका

Kangana Ranaut Viral Video : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतवर हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त मनालीचा दौरा करताना केलेल्या वक्तव्यामुळे टीका...

By: Team Navakal
Kangana Ranaut Viral Video

Kangana Ranaut Viral Video : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतवर हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त मनालीचा दौरा करताना केलेल्या वक्तव्यामुळे टीका होत आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या कंगनाने आपल्याच रेस्टॉरंटच्या नुकसानीची तक्रार केली.

तीन आठवड्यांनी हा दौरा केल्याबद्दल स्थानिकांनी तिला प्रश्न विचारल्यावर तिने हे वक्तव्य केले. त्यानंतर आता तिच्यावर टीका होत आहे. तसेच, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दौऱ्यात जनतेचा विरोध

मंडी मतदारसंघाची खासदार असलेल्या कंगनानेपूरग्रस्त भागांची पाहणी केली. स्थानिक लोक आणि पत्रकारांनी तिला उशिरा भेट दिल्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर ती म्हणाली, “तुम्ही फक्त माझ्यावरच टीका करणार असाल तर मी काम कसे करणार? आधी शांत व्हा. माझेही इथे घर आहे. मला कोणत्या संकटाचा सामना करावा लागत आहे याची कल्पना करा.

माझेही इथे एक रेस्टॉरंट आहे, ज्यात काल फक्त 50 रुपयांचा व्यवसाय झाला, पण मला 15 लाख रुपये पगार द्यावा लागतो. तुम्ही माझेही दुःख समजून घ्या, मी सुद्धा माणूसच आहे.”, असे वक्तव्य तिने केले. तिच्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला. तिच्या ताफ्याला स्थानिकांनी काळे झेंडे दाखवून ‘गो बॅक’ च्या घोषणाही दिल्या.

या दौऱ्यात कंगनाने काँग्रेस सरकारवरही गंभीर आरोप केले. मदत निधीचा गैरवापर होत असल्याचा तिने आरोप केला आहे.

“मला वाटते की निधीचा गैरवापर केला जात आहे. केंद्राने आपत्कालीन मदतीसाठी पाठवलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा संशय आहे,” असे तिने म्हटले. गेल्या तीन वर्षांत हिमाचल प्रदेशला 10,000 कोटींहून अधिक निधी मिळाला असतानाही अनेक कुटुंबांना मदत मिळाली नसल्याचे तिने निदर्शनास आणून दिले.

हे देखील वाचा अमेरिकेचा मोठा निर्णय! भारतीय अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द; कारण काय? जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या