Ind vs SA Test Series : ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका मोठ्या क्रिकेट हंगामासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. 14 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत भारत दोन कसोटी, तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच T20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करणार आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका गमावली असली तरी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने T20 मालिका 2-1 ने जिंकून दमदार कामगिरी केली होती. आता या ‘फ्रीडम ट्रॉफी’मध्ये मायदेशातील मैदानांवर भारताला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
कसोटी मालिकेपासून सुरुवात
या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात 14 नोव्हेंबर रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे पहिल्या कसोटीने होईल.
| कसोटी सामना | तारीख | ठिकाण |
| 1 ला | 14-18 नोव्हेंबर | ईडन गार्डन्स, कोलकाता |
| 2 रा | 22-26 नोव्हेंबर | बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी |
वाहाटीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात वेळेची बचत आणि खेळ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लंच ब्रेकच्या आधी टी ब्रेक घेतला जाईल. क्रिकेटच्या इतिहासात हा बदल पहिल्यांदाच होणार आहे.
T20 विश्वचषक आणि ICC स्पर्धांच्या तयारीसाठी ही T20 आणि एकदिवसीय मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
एकदिवसीय आणि T20 वेळापत्रक
एकदिवसीय सामने (ODI):
| सामना | तारीख | ठिकाण |
| 1 ला | 30 नोव्हेंबर | JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची |
| 2 रा | 3 डिसेंबर | शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर |
| 3 रा | 6 डिसेंबर | ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम |
T20 आंतरराष्ट्रीय सामने (T20I):
| सामना | तारीख | ठिकाण |
| 1 ला | 9 डिसेंबर | बाराबती स्टेडियम, कटक |
| 2 रा | 11 डिसेंबर | महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियम, मुल्लनपूर |
| 3 रा | 14 डिसेंबर | HPCA स्टेडियम, धर्मशाला |
| 4 था | 17 डिसेंबर | अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ |
| 5 वा | 19 डिसेंबर | नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद |
भारत कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ
टेम्बा बवुमा (कर्णधार), कोर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, झुबेर हमजा, सायमन हार्मन, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल व्हेरेइन.
हे देखील वाचा – Flipkart ची खास ऑफर! Oppo च्या फोनवर बंपर डिस्काउंट; मिळेल 7000mAh बॅटरी आणि 32MP कॅमेरा









