Poco C85 5G : Poco (पोको) कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन आणि परवडणारा 5G स्मार्टफोन Poco C85 5G (पोको सी85 5जी) लाँच केला आहे. हा फोन 6.9 इंच एच डी प्लस डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 33W जलद चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
Poco C85 5G चे फीचर्स, तपशील आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Poco C85 5G चे तपशील आणि वैशिष्ट्ये
डिस्प्ले आणि प्रोसेसर
- या फोनमध्ये 6.9 इंच एच डी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
- डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1600×720 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
- टीयूव्ही रिनहँड लो ब्लू लाईट आणि फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशनने हा डिस्प्ले सुसज्ज आहे.
- प्रोसेसर म्हणून यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आले आहे, जे माली-जी 57 एम सी 2 जीपीयू सोबत काम करते.
- हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएस 2.2 वर चालतो. कंपनीने 2 मोठे अँड्रॉइड अपग्रेड आणि 4 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्सचे वचन दिले आहे.
कॅमेरा आणि मेमरी
- कॅमेरा सेटअप: C85 5G च्या मागील बाजूस एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एफ/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- मेमरी: यात 4 GB, 6 GB, किंवा 8 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे.
- मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येते. तसेच 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम एक्सपान्शनचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
बॅटरी आणि इतर सुविधा
- बॅटरी: यात 6,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 10W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
- सुरक्षा: सुरक्षेसाठी या फोनमध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. धुळीपासून आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग मिळाली आहे.
- कनेक्टिव्हिटी: यात 5जी, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल 4G व्हो एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जी पी एस आणि यूएसबी टाईप सी पोर्टचा समावेश आहे.
- उपलब्धता: हा फोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. 16 डिसेंबर 2025 पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Poco C85 5G ची भारतातील किंमत आणि लाँच ऑफर
- 4 GB + 128 GB स्टोरेज मॉडेल: ₹11,999
- 6 GB + 128 GB स्टोरेज मॉडेल: ₹12,999
- 8 GB + 128 GB स्टोरेज मॉडेल: ₹14,499
लाँच ऑफर अंतर्गत, ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ₹1,000 चा त्वरित बँक डिस्काउंट मिळवू शकतात. तसेच, ₹1,000 चा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. याशिवाय, क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर 3 महिन्यांची नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देखील दिली जात आहे. सर्व ऑफर विक्रीच्या पहिल्या दिवशीच वैध आहेत.
हे देखील वाचा – Leopard Attack : बिबट्यांच्या हल्ल्यांवर वनमंत्र्यांचा अजब-गजब उपाय; ₹1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणार









