IND vs SA 2nd T20I : पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना विजयी केल्यानंतर, भारतीय संघ आता याच प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळण्यासाठी न्यू चंदीगड (मुलानपूर) येथे पोहोचला आहे. हा रोमांचक सामना 11 डिसेंबरला होणार आहे. 2026 मध्ये भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघ या मालिकेमध्ये चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा टी20 सामना कधी व कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊया.
सामना कुठे आणि कधी होणार?
ठिकाण: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना न्यू चंदीगडमधील मुलानपूर येथील महाराजा यादवेंद्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
वेळ: हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.
थेट प्रक्षेपण (Live Streaming): स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर आणि हॉटस्टारवर ओटीटी ॲपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ
2026 टी20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची असल्याने, दोन्ही संघांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.
दक्षिण आफ्रिका संघ
एडेन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅनसेन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोव्हान फरेरा (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, ऑटनिल बार्टमन, केशव महाराज, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्खिया.
हे देखील वाचा – Royal Enfield Classic 350 ला टक्कर देते ‘ही’ शानदार बाईक; किंमत 15 हजारांनी झाली कमी; पाहा डिटेल्स









