Why Was Rohit Arya Killed in an Encounter – पवई इथे रोहित आर्या या व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवून सरकारकडे थकीत असलेले त्याचे कामाचे पैसे मागितले. मग रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
विधानसभेत आज लक्षवेधीवेळी रोहित आर्या प्रकरणा बाबत काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी प्रश्न मांडले. आर्याने महायुतीचे सरकार असताना स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पावर काम केले होते. त्याचे पैसे सरकारने थकवले होते. त्याने व्हिडिओ कारून सांगितले की माझे पैसे द्यावे ,मी दहशतवादी नाही.
असे असताना रोहित आर्याचे एन्काऊंटर का करण्यात आले? पायावर गोळी का मारली नाही? नेमकी त्याचवेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस कसा काय तिथे उपलब्ध होता? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
या प्रकरणी रोहित आर्या याने वारंवार आंदोलन केले,उपोषण करून पैसे मागितले होते, पण तत्कालीन मंत्री केसरकर यांनी पैसे थकवल्याने ही घटना घडली.या प्रकरणी माजी मंत्र्यांची चौकशी केली का? सरकारकडे पैसे प्रलंबित आहेत का? असा प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
यावेळी उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून रोहित आर्याने लहान मुलांना ओलीस धरले म्हणून पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क आयोगाने समिती नेमून चौकशी करायला सांगितले त्यानुसार चौकशी सुरू आहे. यातील संबंधितावर कारवाई होईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
हे देखील वाचा –
महाराष्ट्रातील भ्रष्टाचार उघड! व्हिडिओ, फोटो व्हायरल महेंद्र दळवी आणि नोटा! काम न करता मोबदला
बिबट्यांच्या हल्ल्यांवर वनमंत्र्यांचा अजब-गजब उपाय; ₹1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणार









