Home / महाराष्ट्र / Raj thackeray : रेल्वे भरतीवेळी परप्रांतीयांना मारहाण हा गुन्हा नाहीच! राज ठाकरे यांचे उत्तर

Raj thackeray : रेल्वे भरतीवेळी परप्रांतीयांना मारहाण हा गुन्हा नाहीच! राज ठाकरे यांचे उत्तर

Raj thackeray – ठाणे न्यायालयात आज 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीवेळी परप्रांतीयांना मनसेने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची आज सुनावणी...

By: Team Navakal
raj thackeray
Social + WhatsApp CTA

Raj thackeray – ठाणे न्यायालयात आज 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीवेळी परप्रांतीयांना मनसेने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या खटल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांच्यासह सात आरोपी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, परप्रांतियांना मारहाण हा मुळात गुन्हा नाहीच. हा गुन्हा मी केलेला नाही. हे वाक्य बोलून राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात मनसेने केलेले आंदोलन योग्य असल्याचेच राज ठाकरे यांनी ठासून सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.


याप्रकरणी न्या. अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का, असे विचारले. त्यावर गुन्हा कबूल नाही असे राज ठाकरे म्हणाले. त्यावर न्यायालयाने एका महिन्यात प्रकरण संपून जाईल त्यासाठी सहकार्य करा, असे त्यांना  सांगितले. त्यावर राज यांनी न्यायालयाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट  केले. दीड मिनिटात सुनावणी संपली. यावेळी वकील ओंकार राजूरकर, आदित्य शिरोडकर आणि मंदार लोणारे यांनी ठाकरेंची बाजू मांडली. राज ठाकरे यांना सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर न राहण्याची मुभा कोर्टाने आज दिली.


ठाकरेंच्या वकिलांनी सांगितले की,  आरोप निश्चित करण्यासाठी आजची सुनावणी झाली.राज ठाकरेंनी  गुन्हा मान्य नसल्याचे  सांगितल्याने आता हा खटला पुढे चालवला जाणार आहे.पुढच्या तारखेला साक्षी पुरावे आणि उलटतपासणी होणार आहे. पुढच्या सुनावणीसाठी राज ठाकरेंची उपस्थिती आवश्यक नाही .  मात्र जेव्हा न्यायालय सूचना देईल तेव्हा उपस्थित राहणार आहेत.


या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह इतर सात मनसैनिकांवर विरोधात  गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. यावर कल्याण न्यायालयात  सुनावणी सुरू होती.  मात्र नंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने समन्स देऊन अटक वॉरंट बजावले होते. मात्र ठाकरेंच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट रद्दकेले होते. अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती.

मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना कल्याण स्टेशनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता. बिहारच्या एका उमेदवाराने कल्याण पोलिसात राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिले जाते. रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा  आरोप मनसेने केला  होता. त्यानंतर झालेल्या हल्लाप्रकरणात राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर  गुन्हा दाखल झाला होता.


हे देखील वाचा –

पुरुषांना लाभ आणि 26 लाख बोगस लाभार्थी आरोप; ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ उघड! अपात्रांकडून वसुली सुरू

बिबट्याला पाळीव प्राणी दर्जा द्या; आ. रवी राणा यांची अजब मागणी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या