Arshdeep Singh Longest Over : दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 51 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 213 धावा केल्या. तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 162 धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र, या सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अर्शदीपचा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील नकोसा विक्रम
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 11 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या भारताच्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी ही ओव्हर अत्यंत खराब ठरली.
ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डीकॉकने त्याला षटकार मारला.या दबावात अर्शदीपने पुढचे दोन चेंडू ऑफ-स्टंपबाहेर इतके वाईड (Wide) टाकले की तो ट्रामलाइनच्या आत चेंडू ठेवू शकला नाही.
यानंतर डीकॉकने रिव्हर्स लॅप शॉट चुकवल्याने अर्शदीपने एक डॉट बॉल टाकला. अर्शदीपचा संघर्ष इथेच संपला नाही; त्याने याच ओव्हरमध्ये पाच अतिरिक्त वाईड चेंडू टाकले. परिणामी, या 11 व्या ओव्हरमध्ये 7 वाईड चेंडूसह एकूण 13 चेंडू टाकले गेले आणि अर्शदीपने 18 धावा दिल्या.
सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम बरोबरीत
या कामगिरीमुळे अर्शदीप सिंगने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण-सदस्य राष्ट्रांमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक चेंडू टाकण्याच्या अफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकच्या (Naveen-ul-Haq) विक्रमाची बरोबरी केली आहे. नवीनने गेल्या वर्षी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) हा नकोसा विक्रम केला होता.
या ओव्हरमुळे अर्शदीप आता T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात लांब ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी खलील अहमद आणि हार्दिक पांड्या यांनी 11 चेंडूंची ओव्हर टाकण्याचा विक्रम केला होता.
खलीलने 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 11 चेंडूंत 11 धावा दिल्या होत्या. हार्दिक पांड्याने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 चेंडूंत 19 धावा दिल्या होत्या. यापूर्वी 2024 च्या T20 विश्वचषकात अर्शदीपने आयर्लंडविरुद्ध 10 चेंडूंची ओव्हर टाकली होती.
Gautam Gambhir's reaction after seeing Arshdeep's 5th wide in a row 😭 pic.twitter.com/tTGq0VAA2f
— Sohel. (@SohelVkf) December 11, 2025
गंभीरचा संताप
अर्शदीपच्या या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूप संतापलेले दिसला. गंभीरच्या प्रतिक्रियेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा – India US Trade : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वाची चर्चा; व्यापारी कराराला मिळणार का गती?









