Mahapalika nivadnuk- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर काल रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा केली. या बैठकीत महापालिकांबाबत( Mahapalika nivadnuk) वरिष्ठ स्तरावर 100 टक्के महायुती करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी दिली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्यावर सहमती झाली. येत्या सर्व महापालिकांमध्येही महायुती एकसंधपणे सामोरे जाणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सकारात्मकपणे पुढे गेले पाहिजे, असा पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येक महापालिकेच्या पातळीवर 4-5 प्रमुख नेत्यांची समिती स्थापन केली जाईल. ही समिती महायुतीबाबत प्राथमिक चर्चा करत भूमिका निश्चित करील. सर्वत्र महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यात कोणालाही बाजूला करण्याचा प्रश्न नाही. महायुती म्हणूनच पालिका निवडणुका लढवल्या जातील. याबाबत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून, ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या दूर केल्या जातील. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य महायुती म्हणून महत्त्वाचे आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीतही घेण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि इतर पालिकेत आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी वेगळे लढण्याची आवश्यकता भासल्यास तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल.
दरम्यान, या एकजुटीवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, यांनी मतमोजणीला 20 दिवस लावले. आता हे ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करतील आणि निवडणूक जिंकतील. तुमची युती होऊ द्या, पण निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. मग जनता तुमचे स्थान दाखवेल. उबाठा आमदार भास्कर जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना भाजपा केवळ गरज असेल तेव्हाच जवळ करते. विदर्भात भाजपाची ताकद असल्याने भाजपाने त्यांना सोबत घेतले नाही. कोकणात भाजपाने अजित पवार गटाला महायुती म्हणून एकही जागा दिली नाही. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात युती म्हणून हे लढले नाहीत. भाजपा केवळ गरजेनुसार मित्रपक्ष वापरतो आणि नंतर सोडून देतो.
मलिकांच्या नेतृत्वाला
मुंबईत भाजपाचा विरोध
मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर झाला असला तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वावरून महायुतीत फूट पडण्याची चिन्हे आहेत. मुंबईत जर राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असेल, तर भाजपा युतीसोबत राहणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे. सध्या नवाब मलिक हेच मुंबई राष्ट्रवादी प्रमुख आहेत. याबाबत भाजाप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, मुंबईत राष्ट्रवादी जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असेल, तर भाजपा कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत युती करणार नाही. इतर कुणाच्याही नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर आमची हरकत नाही. मात्र नवाब मलिक यांचे नेतृत्व भाजपाला कधीच मान्य होणार नाही. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगपासून दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप आहेत. राष्ट्रविरोधी आणि देशविघातक शक्तींशी सलोखा ठेवणार्या व्यक्तीशी भाजपा कोणतेही राजकीय संबंध ठेवणार नाही. मलिक यांच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून महायुतीत उभे राहिलेले हे मतभेद आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील समीकरणां
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
महाराष्ट्र शासनाच्या 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी; रिफंडही मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश









