Dhurandhar : रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर’मुळे चांगलाच चर्चेत आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत असल्याचे दिसत आहे, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरही सर्वत्र ‘धुरंधर’चीच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच आता रणवीरने देखील पहिल्यांदाच या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रणवीर सिंह ‘धुरंधर’मध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेतून काम करताना दिसत आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटातील त्याच्या कामाचं प्रेक्षकही तोंडभरून कौतुक करीत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्याने सुरवातीला कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, आता चित्रपटाला मिळत असलेल्या यशानंतर आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता, त्यानं नुकतीच इन्स्टग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामधून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रणवीर सिंहनं स्टोरी पोस्ट करीत ‘धुरंधर’बद्दल म्हटलं, “नशिबाची एक खूप सुंदर गोष्ट असते ज्यात योग्य वेळ आली की, ते नक्कीच बदलतं…”. पुढे अभिनेत्यानं, “पण तोपर्यंत… आशा आणि संयम ठेवा. ” असं म्हणत इन्स्ट्राग्रामवर स्टोरी शेयर केली आहे. रणवीर सिंह शेवटचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळकला होता. १ नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याचा हा चित्रपट आपल्या भेटीला आला. त्यानंतर अभिनेता आता ‘धुरंधर’मुळे चांगलाच गाजताना दिसत आहे.
बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे, ज्यामध्ये केवळ भारतात १४४ कोटी रुपयांची भर पडली आहे. सोमवारी, चित्रपटाने सोमवारच्या दुसऱ्या चाचणीतून प्रवास केला, त्यामुळे त्याच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय घट होणार नाही याची खात्री केली. धुरंधरने दुसऱ्या रविवारी भारतात ५८ कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी १४३.५० कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ही केवळ ४०% वाढ होती असे नाही तर चित्रपटाने फक्त १० दिवसांत ३५० कोटींची निव्वळ घरगुती कमाई देखील केली.
हे देखील वाचा – High-Protein Winter Soups : रात्रीच्या जेवणासाठी उच्च-प्रथिनेयुक्त हिवाळ्यातील सूप









