Home / देश-विदेश / Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर; मविआचे खासदार अमित शहांच्या भेटीला; शौर्य पाटीलच्या कुटुंबियांच्या भेटीला

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर; मविआचे खासदार अमित शहांच्या भेटीला; शौर्य पाटीलच्या कुटुंबियांच्या भेटीला

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतात. ते...

By: Team Navakal
Manoj Jarange
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतात. ते आता सध्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी शाळकरी मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, आणि दोषी शिक्षकांवर लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

तर; दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह (Amit shah) यांची भेट घेत शौर्य पाटील मृ्त्यूप्रकरणात अधिक चौकशीची मागणी केली. त्यावेळी, अमित शाह यांनी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. उद्याच विशेष तपास पथक नेमण्याबाबत सूचना देतो, असे देखील अमित शाह यांनी म्हटले. खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शाह यांना पत्र देण्यात आलं असता, याबाबत माझ्याकडे शरद पवार यांचेही पत्र आल्याचे देखील अमित शाह यांनी सांगितले.

शिवाय या प्रकरणाबाबत मनोज जरांगे हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास मिशनरी शाळेचे जे फादर आहेत त्यांनी हि दखल घ्यावी कि महाराष्ट्रात इतर राज्यात त्याच्या (शाळेच्या) इतरही शाखा आहेत हे लक्षात ठेवावे. मी अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही लक्षात घ्या. शौर्य पाटीलच्या मृत्यूप्रकरणी जरांगे पाटील यांनी अमित शहाणा परखड असे सवाल केले आहेत शिवाय नरेंद्र मोदींनी देखील यात लक्ष दिलं पाहिजे, असे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आम्ही मुंबई बंद करू शकतो, आमच्या मुलाचे बलिदान वाया जाणार नाही, अशी कठोर भूमिका देखील जरांगे पाटील यांनी मांडली. अमित शाह यांनी आरोपीला 8 दिवसांत अटक करावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली.


हे देखील वाचा – Praful Patel Sunil Tatkare Amit Shah Meet : प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला; प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या अमित शहा भेटी दरम्यान नेमकी चर्चा काय?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या