Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ! माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट..

Devendra Fadnavis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ! माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट..

Devendra Fadnavis On Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आता चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहेत....

By: Team Navakal
Devendra Fadnavis On Manikrao Kokate
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis On Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आता चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहेत. माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने याआधी १६ नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या हालचालीना वेग आल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate Arrest Warrant) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघावं, यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अटक वॉरंटसाठी अंजली दिघोळे यांनी याआधी अर्ज दाखल केला आहे. अंजली दिघोळे यांच्या या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार यावरती काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

याच पार्शवभूमीवर, आज सकाळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतील. या भेटीत मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरुन देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar Devendra Fadnavis Meet)

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? (Ajit Pawar Devendra Fadnavis Meet)
अजित पवार यांनी आजच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली असल्याची बातमी सध्या सर्वत्र पसरत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा तुम्हीच निर्णय घ्या, असे देखील अजित पवार यांना सांगितले. तसेच माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा, असा थेट प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना यावेळी विचारला असल्याची माहिती आहे. हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली, तरच माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद त्यांच्या हातून जाणार नाही.

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी जवळपास ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त करून दिल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली गेली होती.

प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला देखील प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५०० हजारांचा दंड अशी शिक्षा देखील सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, काल झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला असल्याने माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


हे देखील वाचा – Ambernath Crime News : अंबरनाथमध्ये गोळीबाराचा थरार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री फायरिंग; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या