Home / महाराष्ट्र / Gen-Z Post Office : डिजिटल पिढीसाठी खास मुंबईतले पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस; उद्या होणार उद्घाटन

Gen-Z Post Office : डिजिटल पिढीसाठी खास मुंबईतले पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस; उद्या होणार उद्घाटन

Gen-Z Post Office : भारतात प्रत्यक पिढी कडून शिकण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. जुनी पिढी आपल्याला संस्कृतीचा वारसा देते. आणि त्यांच्या...

By: Team Navakal
Gen-Z Post Office
Social + WhatsApp CTA

Gen-Z Post Office : भारतात प्रत्यक पिढी कडून शिकण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. जुनी पिढी आपल्याला संस्कृतीचा वारसा देते. आणि त्यांच्या नंतरची पिढी तो जतन करते आणि त्यानंतर येते ती जेन झी पिढी ती हा वारसा पुढे घेऊन जाते. या सगळ्या नैसर्गिक चक्रामुळे देशात अनेक नवीन गोष्टींना चालना मिळते आहे. विकसित भारत म्हणून देश नावारूपाला येत आहे. आणि याच विकासाला पुढे नेट भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस (Gen-Z Post Office) (टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या जेन झी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक संलग्नपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाणार आहे.

भारतीय टपाल सेवेच्या एका नवीन परिवर्तनकारी दृष्टिकोनाशी अनुरूप असलेले हे जेन झी टपाल कार्यालय विशेषतः तरुण मंडळी, विद्यार्थी आणि डिजिटल युगातील लोकांसाठी तयार केलेल्या टपाल सेवांसाठी एक नवीन आणि समकालीन दृष्टिकोन यामुळे सादर केला जाणार आहे.

या आधी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या टपाल कार्यालयांच्या यशस्वी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईत देखील हा शुभारंभ देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे. देशभरात विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह तसेच भारतीय टपाल सेवेच्या (मुंबई विभाग) टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते, आयआयटी मुंबईच्या कुलसचिवांच्या सन्माननीय उपस्थितीत, याशिवाय भारतीय टपाल सेवेचे अधिकारी आणि कर्मचारी याचबरोबर आयआयटी मुंबईतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

या जागेची रचना, भित्तिचित्रे आणि भिंतींवरील डिझाइन भारतीय टपाल सेवेच्या चमूने आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधून संकल्पित आणि विकसित केले आहेत. त्यामुळे यामध्ये सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख असा संगम देखील साधण्यात आला आहे.

या जेन झीच्या टपाल कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये पहा :

१. मोफत वाय-फाय सुविधा देखील याठिकाणी असणार आहे.
२. कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था आणि एक छोटे वाचनालय देखील असणार आहे.
३. समर्पित संगीत कक्षसुद्धा या ठिकाणी असेल.
४. निवडक टपाल तिकीट संग्रह संबंधित पूरक वस्तूचा पुरवठा सुद्धा होणार आहे.
५. पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पार्सल ज्ञान पोस्ट’.
६. पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण.
७. आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा.
८. टपाल कार्यालय बचत बँक योजनेचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन.

जाणून घ्या विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष सवलती :

१. स्पीड पोस्ट सेवांवर १० टक्के सवलत मिळणार आहे.
२. मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी ५ टक्के सवलत देखील मिळणार आहे.

टपाल सेवा हि भारतात वर्षानु वर्षे चालत आली आहे त्यामुळे कार्यालयाची एक गतिशील समुदाय केंद्र म्हणून ओळख निर्माण करून, परंपरा आणि नाविन्य यांचा मेळ घालणे, हा भारतीय टपाल सेवेचा प्रमुख उद्देश आहे. ज्यामुळे जेणेकरून टपाल सेवा पुढील पिढीसाठी कालानुरूप, आकर्षक आणि सुलभ सुरु राहतील.


हे देखील वाचा – Raja Shivaji Movie: ‘राजा शिवाजी’चा चित्रीकरणाचा टप्पा पूर्ण! रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या