Home / महाराष्ट्र / Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला

Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची अटकच ‘बेकायदेशीर’ असल्याबाबत यापूर्वीच्या सुनावणीवेळी...

By: Team Navakal
Walmik Karad
Social + WhatsApp CTA

Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची अटकच ‘बेकायदेशीर’ असल्याबाबत यापूर्वीच्या सुनावणीवेळी त्याच्यावतीने केलेला युक्तिवाद सरकार पक्षाने मंगळवारी खोडून काढला. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत वाल्मीक कराडची अटक ‘कायदेशीर’ असल्याचे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी त्यावर अधिक प्रकाश टाकला. सरकारपक्ष आणि फिर्यादीतर्फे सुमारे साडेतीन तास प्रदीर्घ युक्तिवाद सुरु होता. याच प्रमाणे आज देखील हा युक्तिवाद पार पडला आणि यात महत्वाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज वाल्मिक कराडचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सलग दोन दिवस या सगळ्याप्रकारणाची सुनावणी सुरु होती. बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी वाल्मीक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यासाठीच जामिनाकरीत त्याने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.

या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वाल्मीकच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी त्याची बाजू मांडताना म्हणाले कि, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकील ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी खुनाचा घटनाक्रम तपशीलवार सांगितलं त्यांनी यात सांगताना या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशिलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफीत मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. आणि त्यानंतर वाल्मिक कराडचा जमीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.

या निकालानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी युक्तिवाद लढवत असलेल्या वकिलाचे मनापासून आभार मानले आहेत. याशिवाय अन्यायाच्या विरोधात असेच उभं राहून लढा देऊ असेही ते म्हणाले.


हे देखील वाचा – MNS Women Kurla : मनसेत अंतर्गत कुरघोडी; मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कुर्ल्यातील महिला कार्यकर्त्या आक्रमक

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या