Devendra Fadnavis : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून आले. काल याच पार्शवभूमीवर आदित्य ठाकरेंची वरळीतील डोम येते सभा पार पडली. यात त्यांनी सत्ताधार्यांना लक्ष केले. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा पार पडली. अंबरनाथच्या उमेदवार तेजश्री करजुलेच्या प्रचारासाठी हि सभा घेण्यात आली.
या प्रचारात अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. या सभेत मुखमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या विकासाचा आराखडा मांडला. शिवाय या सभेत मी कोणाची उणी धुनी काढायला आलो नसून विकसनशील राज्याबद्दल आपलं मत मांडायला आलो आहे असा दृढ विश्वास त्यांनी या वेळी सभेत मांडला. शिवाय या ते असे हि म्हणले कि तू ज्या लोकांना तू मे मे करावी त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नसतो म्हणून ते टीका करत असतात पण भारतीय जनता पक्षा जवळ विकासाचा अजेंडा आहे. आम्ही तो वेळोवेळी सिद्ध करून दाखवला आहे आणि अर्थात अजून चांगले कार्य करायचे आहे.
या निवडणुकीत त्यांनी विकसित राज्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असल्याची घोषणा देखील केली आहे. पुढच्या ३ वर्षात राज्यात एसी लोकल होणार असल्याचे त्यांनी सांगतिले. शिवाय या लोकलचे दरवाजे हे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद असणार असल्याचे देखील त्यांनी या सभेत सांगतिले. या व्यतिरिक्त विशेष सांगायचे झाले तर या एसी लोकलचे भाडे हे आताच्या लोकल एवढेच असणार आहे. यात एकही रुपया वाढणार नसल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांचा हा अंबरनाथ दौरा निवडणुकांना कोणतं नवीन वळण देणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.









