Home / महाराष्ट्र / Supriya Sule on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध; धनंजय मुंडे अमित शहा भेटीवर सुप्रिया सुळेंची टीका..

Supriya Sule on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध; धनंजय मुंडे अमित शहा भेटीवर सुप्रिया सुळेंची टीका..

Supriya Sule on Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात नेत्यांचे आपसातील वाद तसेच पक्ष प्रवेश या घटना सातत्याने घडताना दिसत आहे....

By: Team Navakal
Supriya Sule on Dhananjay Munde
Social + WhatsApp CTA

Supriya Sule on Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात नेत्यांचे आपसातील वाद तसेच पक्ष प्रवेश या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. शिवाय क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये धनंजय मुंडेंचा कमबॅक होणार अशी चर्चा रंगली आहे.

माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच धनंजय मुंडेंची एन्ट्री मात्र काही लोकांना रचलेली नसल्यचे दिसून येत आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कमबॅकला कडाडून विरोध केला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती का? देशमुखांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर कोणा कोणाला फोन झाले? हे सर्व समोर असताना त्यांची भेट कशी काय झाली असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याचसोबत संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय अमित शाहांनी त्यांना भेट कशी दिली? असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे आणि अमित शाहांच्या भेटीवर देखील ताशेरे ओढले आहेत. त्यांची भेट हि विकासाच्या मुद्द्यावर असल्याचे म्हटले जाते त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला लगावला. जर सत्ताधारी आमदारांचीच काम होत नसतील तर हा मोठा प्रॉब्लेमच असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, गृह खातं आणि सहकार खाते हे अमित शाहांकडे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सहकार खाते हे त्यांच्याच पक्षाकडे आहे, मग असं कोणतं काम होते की ते तुमच्याच पक्षाचा मंत्री करू शकत नाही आहे? असा थेट सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला थोडं वाईट वाटलं, ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत अर्थात ते सिद्ध नाही झाले आहेत हे मी मान्य करते, पण त्यांचा राजीनामा घेतला. काल संतोष भाऊंची संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होत. काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले, मी मुंडे कुटुंबांशी देखील बोलले. या पार्श्वभूमीवर मला खरंतर नवल वाटलं की अमित शहांनी त्यांना भेट कशी दिली काय कारण असेल मला माहिती नाही. असे त्या म्हणाल्या

पुढे त्या म्हणाल्या संतोष भाऊंच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने घेतला होता ना. अशा व्यक्तीला भेटणं हे कितपत योग्य आहे? अस देखील त्या म्हणाल्या. मुंडे यांनी विकासासाठी भेटल्याचे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे कोणत्या विकासाचं काम असेल. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.


हे देखील वाचा – PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? तारखेबाबत मोठी अपडेट

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या