Home / महाराष्ट्र / Mumbai Underground Metro : भुयारी मेट्रो पुन्हा एकदा कोलमडली; मेट्रोला तांत्रिक बिघाडाचा फटका

Mumbai Underground Metro : भुयारी मेट्रो पुन्हा एकदा कोलमडली; मेट्रोला तांत्रिक बिघाडाचा फटका

Mumbai Underground Metro : मुंबईची लोकल हि मुंबईची लाईफलाईन जरी असली तरी मुंबईतील मेट्रो हि आता काळाची गरज बनल्याचे दिसून...

By: Team Navakal
Mumbai Underground Metro
Social + WhatsApp CTA

Mumbai Underground Metro : मुंबईची लोकल हि मुंबईची लाईफलाईन जरी असली तरी मुंबईतील मेट्रो हि आता काळाची गरज बनल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रो संदर्भातील छोट्यातली छोटी बातमी देखील मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बनते आणि अशीच एक बातमी आता समोर आली आहे. मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ सेवेला आज पुन्हा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ भुयारात मेट्रो काही काळासाठी बंद पडली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.

मेट्रोच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वारंवार उघड-बंद होत होते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उध्दभवला असल्याचे दिसून येते. त्यासाठीच खबरदारी म्हणून मेट्रो काही वेळासाठी थांबवण्यात देखील आली होती. त्यामुळे या बिघाडाचा परिणाम संपूर्ण मार्गिकेवरील मेट्रो सेवांवर झाला. ही घटना सीएसएमटी स्थानकावर घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेडला जाणारी मेट्रो स्थानकावर उभी असताना प्रवाशी मेट्रोत बसले होते. मात्र, मेट्रोचे दरवाजे सतत उघड-बंद होत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. मेट्रोचे दरवाजे बंद न झाल्यामुळे मेट्रो जागीच थांबवण्यात आली.

या अचानक झालेल्या बिघाडामुळे मेट्रोतील प्रवाशांना मात्र याचा प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर देखील पाहायला मिळाले. दरम्यान, तांत्रिक पथकाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती असून, मेट्रो सेवा लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान २५ नोव्हेंबर रोजीही कफ परेड स्थानकाजवळ अशाच प्रकारचा तांत्रिक बिघाड झाला होता. वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे मेट्रो-३च्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


हे देखील वाचा – BMC Election 2026 : शरद पवार निवडणुकीत कोणाची साथ देणार? शरद पवार संजय राऊत बैठकीत नेमकं काय ठरलं? पवारांच्या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या