Manikrao Kokate : नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा काल मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारल्याचे मुख्यमंत्रीनी आज सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अखेर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला असल्याचे देखील समोर आले. तर दुसरीकडे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ब्लडप्रेशर वाढल्यानं माणिकराव कोकाटेंना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात (Manikrao Kokate Health Update) आता एक महत्वाची बातमी समोर वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे. कोकाटे यांचा उच्चरक्त दाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डाॅक्टरांनी पोलिसांना (Nashik Police) दिली आहे.
सध्या कोकाटेंवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून उच्च रक्तदाबाचा होणारा त्रास हा नियंत्रणा बाहेरचा असून पुढील काही दिवस देखरेखेखाली ठेवणे गरजेचे असल्याचे मत डाॅक्टरांनी पोलिसांसमोर व्यक्त केले.
दरम्यान, वैदयकिय अहवाल आणि तज्ञ डाॅक्टरांचे मत लक्षात घेता NBW वाॅरंट पोलिस रुग्णालयात देण्यास हरकत नसते. अशी माहिती सध्या आहे. त्यामुळे अटकेची कारवाई होण्याची शक्यता सध्या तरी कमीच असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटे यांना नुकतेच अँजिओग्राफीसाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात सध्या त्यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचेही लक्ष लागून राहिले आहे.आणि त्यानंतर, अँजिओग्राफीच्या रिपोर्टनंतरच डॉक्टर आणि पोलिसांमध्ये चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.
माणिकराव कोकाटेंच सदनिका प्रकरण नेमकं काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका प्राप्त केली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवली होती. या प्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी देखील ठरवलं होतं.
त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयाने सुद्धा तीच शिक्षा कायम ठेवली. मात्र त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माननीय न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत हजर झाले आहे. या पथकात दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या भूमिकेवर आणि वैद्यकीय अहवालावर कोकाटे यांचे भविष्य अवलंबून आहे.
हे देखील वाचा – Ambernath Election : अंबरनाथ नगरपरिषदेसाठी उद्या मतदान; रविवारी पार पडणार मतमोजणी









