Home / महाराष्ट्र / Dadar Incident : दादर परिसरात मनोरुग्णाचा गोंधळ; तब्ब्ल ४ तासांच्या प्रयत्नांनंतर अज्ञात व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Dadar Incident : दादर परिसरात मनोरुग्णाचा गोंधळ; तब्ब्ल ४ तासांच्या प्रयत्नांनंतर अज्ञात व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Dadar Incident : मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी रोज नवीन गोष्टी घडत असतात आजही एक असाच विचित्र प्रकार समोर आला आहे....

By: Team Navakal
Dadar Incident
Social + WhatsApp CTA

Dadar Incident : मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी रोज नवीन गोष्टी घडत असतात आजही एक असाच विचित्र प्रकार समोर आला आहे. एक अज्ञात तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होताना दिसत आहे. संबंधित तरुण अर्धनग्न अवस्थेत असून मनोरुग्ण असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचले असून या तरुणाचा पाठलाग करताना त्यांचीही दमछाक होत असल्याचे दिसून आले.

दादरच्या टीटी परिसरात रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या चार मजली इमारतींवर एक तरुण अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याची माहिती एका स्थानिकाने पोलिसांना फोन वरून दिली. या अज्ञात तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण हा तरुण इमारतीच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरुन बाजूच्या इमारतींवर उड्या मारत फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनकडून सांगण्यात आले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं आहे. त्याला ४ तासांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित खाली उतरवण्यात आले.


हे देखील वाचा – Uric Acid: युरिक ॲसिड वाढल्यामुळे त्रस्त आहात? औषधांशिवाय घरगुती उपायांनी मिळवा कायमचा आराम

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या