Home / देश-विदेश / Epstein Files Sex Scandal : वासना विकृतीच्या दलदलीचा आज होणार उलगडा? अमेरिकेच्या एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये कोण असेल सामील..

Epstein Files Sex Scandal : वासना विकृतीच्या दलदलीचा आज होणार उलगडा? अमेरिकेच्या एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये कोण असेल सामील..

Epstein Files Sex Scandal : आपल्या देशातील राजकीय वर्तुळात ‘एपस्टीन फाइल्स’ हे शब्द मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. तास...

By: Team Navakal
Epstein Files Sex Scandal
Social + WhatsApp CTA

Epstein Files Sex Scandal : आपल्या देशातील राजकीय वर्तुळात ‘एपस्टीन फाइल्स’ हे शब्द मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. तास पाहायला गेलं तर याची चर्चा अमेरिकेत मागील कित्येक महिन्यांपासून आहे. अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टीन सेक्स स्कँडलशी संबंधित फाइल्स आज प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आहे. या फाइल्सच्या प्रकाशनामुळे त्यात सहभागी असलेल्यांची नावे उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या फायलींमध्ये जगातील प्रमुख उद्योजक आणि राजकारण्यांची नावे सामील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामध्ये हजारो पानांची कागदपत्रे, ९५,००० छायाचित्रे आणि बँक रेकॉर्ड असल्याचे देखील बोलले जात आहे.

या घोटाळ्यात ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांना गोवण्यात आले आहे. परिणामी, किंग चार्ल्स यांनी त्यांचा धाकटा भाऊ अँड्र्यू याला “प्रिन्स” ही पदवी आणि सर्व शाही पदव्या काढून घेतल्या आहेत. २००१ मध्ये, अँड्र्यूवर १७ वर्षीय व्हर्जिनिया गिफ्रे हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही या प्रकरणाशी जोडण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित १९ छायाचित्रांमध्ये ट्रम्प आणि क्लिंटन यांचे नाव समाविष्ट होते. यामध्ये ट्रम्प अनेक महिलांसोबत देखील दिसले.

एपस्टीन स्वतः एक सेक्स हाउंड होता, तो अतिशय विकृत होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले नाही, त्याने जगभरातील धनाढ्य धेंडांना निष्पाप लहान मुली पुरवल्या. त्या मुलींचे अनेकदा शोषण करण्यात आले.

बरीच वर्ष तो हा धंधा करत होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट देखील होते. तिथे तो स्वतःच्या विकृत श्रीमंतीच्या चिखलात बुडालेल्या गलिच्छ लोकांना बोलवायचा, त्यांच्या विकृत वासनांना तो विशिष्ठ आकार द्यायचा. मात्र त्याचा हा नीचपणा अधमपणा इथवरच सीमित नव्हता, हे सर्व शोषण होत असताना त्याचे त्याने शूट केले आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्याने अनेक डील देखील करवून घेतल्या, आणि इतरांना देखील करवून दिल्या. आणि अल्पवयीन मुलींचा पुरवठा करुन तो जगातला सर्वात मोठा सेटलर म्हणून नावारूपाला आला! जगातल्या सगळ्यात पॉवरफुल देशाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याने आपल्या पिकपॉकेटमध्ये ठेवले होते.

सेक्स सिंबॉल असणारी घिस्लेन मॅक्सवेल ही त्याची स्टेपनी कम गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जायची. तिच फक्त एकच काम होत, ते म्हणजे ज्या लोकांना ही घाणेरडी सर्विस पुरवायची असेल त्यांची यादी तयार करणे आणि त्यांना ईमेल पाठवून, फोन कॉल करुन बेटावर अय्याशीसाठी बोलवणे! काही वेळेला तर तिने एपस्टीनच्या फोनवरून टेक्स्ट मेसेज केले आहेत, तर बऱ्याचदा तिच्या फोनवरून तिने या सगळ्या लोकांशी संपर्क साधला. तिने ज्यांना बोलवले त्यातले किती लोक प्रत्यक्षात तिथे आले आणि त्यांनी या घाणीत स्वतःला डुबवले हे आज स्पष्ट होणार आहे. कारण यात ज्यांची नावे सामील आहेत, अशा अनेकांचे म्हणणे आहे की, आम्हाला केवळ कॉन्टॅक्ट करण्यात आला होता आम्ही या घाणेरड्या कृत्यात सामील झालो नाही! पण यावर किती तथ्यता आहे याचा आज उलगडा होणार आहे.

एपस्टीनचे जाळे अत्यंत सुरक्षित असे होते. अल्पवयीन मुलींना पाम बीच, न्यूयॉर्क आणि खासगी बेटावर बोलावले जायचे. या मुलींची तस्करी कशी केली जाई याची माहिती मन सुन्न करणारी आहे.

एका मुलीचे शोषण पूर्ण झाले की, तिच्या सेक्स टेप्सच प्रदर्शन करून तिच्यावर जबरदस्ती केली जायची की, तिने दुसरी मुलगी आणावी! आणि मग ती मुलगी दुसऱ्या मुलीला आणायची. यात त्यांना मॉडेलिंग किंवा मसाजच्या नोकरीचे आमिष दाखवले जायचे. नव्या मुलीला आणल्यास तिला बोनस देखील दिला जायचा. बऱ्याचदा या मुलींना खरोखरंच मसाजचे काम देण्याचे, पण त्या कुणाचा मसाज करत आहेत, हे त्यांना कधीही कळू दिले जायचे नाही. आणि याचेही शूटिंग केले जायचे.

या मसाजपासून सुरू झालेले किळसवाणे कृत्य प्रत्यक्षात लैंगिक शोषणापर्यंत जायचे, तेव्हा त्या मुलीपाशी पर्याय देखील उरलेला नसायचा. या विकृत प्लॅनमध्ये एपस्टीन आणि त्याचे निवडक मित्र सहभागी होत. या मुलींचे बऱ्याचदा एकत्रित शोषण केले जाई! हे सर्व रेकॉर्ड करण्यामागे त्याचे वासनेने, अधिक पैशाच्या हव्यासाने विकृत झालेले डोके होते. जेफरी एपस्टीन हे नाव आज जगभरात लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या प्रकरणाशी सगळ्यात वरच्या स्थानी जोडले गेले आहे.

अमेरिकन अब्जाधीश आणि फायनान्शिअल तज्ज्ञ असलेल्या एपस्टीनने अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी एक मोठे जाळे विणले होते, ज्यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, वैज्ञानिक आणि सेलिब्रिटींचा या सगळ्यांचा समावेश होता असे म्हटले जाते. हे प्रकरण २००० च्या दशकापासून उघडकीस येत गेले, आणि २०२४- २०२५ पर्यंतच्या कोर्टातील दस्तऐवज उघडकीस आल्याने त्याची व्याप्ती आता अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहे.

आज अमेरिकन न्याय विभागाला नव्या कायद्याअंतर्गत एपस्टीनशी संबंधित हजारो पानांच्या गोपनीय दस्तऐवज उघड करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे यातील अनेक तपशील जसेच्या तसे उघड झाल्यास अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा अधिक खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.

एपस्टीन फाइल्सशी संबंधित काही महत्त्वाचे फोटो…

१. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
फोटोमध्ये ट्रम्प सहा महिलांसोबत दिसत आहेत तसे फोटो देखील सोशल मिडिआवर जोरदार व्हायरल होत आहेत.

२. माजी ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू
फोटोमध्ये, प्रिन्स अँड्र्यू १७ वर्षीय व्हर्जिनिया गिफ्रेच्या कंबरेभोवती हात ठेवतात. हा फोटो १० मार्च २००१ रोजी लंडनमधील एका घरात काढण्यात आला होता.

३. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
या छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन (मध्यभागी), जेफ्री एपस्टाईन (उजवीकडे) आणि त्यांची मैत्रीण घिसलेन मॅक्सवेल (उजवीकडून दुसरी) यांचा समावेश आहे.

हे प्रकरण २००० च्या दशकापासून उघडकीस जरी येत गेलं तरीही ह्याची मुख्य सुरवात सर्व २००५ मध्ये सुरू झाले जेव्हा फ्लोरिडामधील एका १४ वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केली. ज्यात तिने आरोप केला होता की तिच्या मुलीला “मसाज” करण्याच्या नोकरीचे आमिष दाखवून एपस्टाईनच्या आलिशान घरात नेण्यात आले होते, परंतु ती आल्यावर तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आण्यात आल्याचे समोर आले. जेव्हा ती घरी परतली आणि तिने तिच्या पालकांना याबद्दल सांगितली तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलिस तक्रार दाखल केली. जेफ्री एपस्टाईन विरुद्ध ही पहिली अधिकृत तक्रार असल्याचे बोलले जाते. पोलिस तपासादरम्यान असे दिसून आले की ही एक वेगळी घटना नव्हती.

हळूहळू, एपस्टाईनवर असेच आरोप करणाऱ्या सुमारे ५० अल्पवयीन मुलींची ओळख पटवण्यात आली. पाम बीच पोलिस विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि अनेक महिने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आणि एपस्टाईनविरुद्ध गुन्हेगारी चौकशी सुरू झाली. तथापि, सुरुवातीच्या चौकशीनंतरही, एपस्टाईनला तुरुंगात जास्त काळ शिक्षा झाली नाही. त्याचा प्रभाव इतका होता की २००८ मध्ये त्याला फक्त १३ महिन्यांचीच शिक्षा झाली, त्या काळात तो तुरुंगाबाहेर देखील काम करू शकला.


हे देखील वाचा – Foldable Phones: लूक आणि परफॉर्मन्समध्ये भारी! 2025 मध्ये ‘या’ 4 फोल्डेबल स्मार्टफोन्सची बाजारात चलती; पाहा फीचर्स

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या