Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : आणखी एका मंत्र्याचा राजीनामा ;उध्दव ठाकरेंचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray : आणखी एका मंत्र्याचा राजीनामा ;उध्दव ठाकरेंचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. तसेच राजकीय हालचालींना देखील वेग आल्याचे दिसून येत...

By: Team Navakal
Uddhav Thackeray
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. तसेच राजकीय हालचालींना देखील वेग आल्याचे दिसून येत आहे.
आज मातोश्रीवर भाजपाच्या संदीप तिवारी आणि समर्थक यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.पालघरचे माजी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आझाद पटेल यांनीसुद्धा आज शिवसेनेत प्रवेश केला.

यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर आपला निशाणा साधला व आजून एक मंत्री जाण्याच्या मार्गावर असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी केले. मात्र त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच गदारोळ पाहायला मिळाला.

ते म्हणतात काल एका मंत्र्याचा राजीनामा झाला.आणखी एक मंत्री जाण्याच्या मार्गावर आहे पण मुख्यमंत्री त्यावर पांघरूण घालत आहेत असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढे ते म्हणतात राजकारणात माणसे लागतात पण ही असली माणसे, हे फार विचित्र आहे.ड्रग्जशी नाव जोडलेली जाणारी माणसे ठाण्याची आहेत.

रिक्षावाल्याच्या भावाला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. ड्रग्जचा कारखाना सुषमा अंधारे यांनी कागदोपत्री पुढे आणला पण मुख्यमंत्री त्याची दखल घेण्यास तयार नाहीत. महाराष्ट्रातील मुले ड्रग्जच्या आहारी जात आहेत. असे असताना आपली मुले आपण त्यांच्या हवाली करणार आहोत का? असा प्रश्न त्यांनी केला. मीरा रोड येथील भाजपाच्या पदाधिका-यांनी आज ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.


हे देखील वाचा – Epstein Files Sex Scandal : वासना विकृतीच्या दलदलीचा आज होणार उलगडा? अमेरिकेच्या एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये कोण असेल सामील..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या