Home / क्रीडा / IND vs NZ: टीम इंडिया पुन्हा मैदानात कधी उतरणार? दक्षिण आफ्रिकेनंतर आता न्यूझीलंडशी भिडणार; पाहा वेळापत्रक

IND vs NZ: टीम इंडिया पुन्हा मैदानात कधी उतरणार? दक्षिण आफ्रिकेनंतर आता न्यूझीलंडशी भिडणार; पाहा वेळापत्रक

IND vs NZ Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 3-1 ने खिशात...

By: Team Navakal
IND vs NZ
Social + WhatsApp CTA

IND vs NZ Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 3-1 ने खिशात घातल्यानंतर आता टीम इंडियाचे लक्ष मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेवर आहे. जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही देशांमध्ये मर्यादित षटकांची चुरस पाहायला मिळणार आहे. या दौऱ्यात एकूण 8 सामने खेळवले जाणार असून यामध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामन्यांचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिकेपासून होणार सुरुवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मोहिमेची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.

  • पहिला वनडे: मालिकेतील सलामीचा सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा येथे खेळवला जाईल.
  • दुसरा वनडे: दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये पार पडेल.
  • तिसरा वनडे: मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना 18 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे.

टी20 वर्ल्ड कपपूर्वी ५ सामन्यांची मोठी मालिका

एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू होईल. या मालिकेतील सर्व सामने संध्याकाळी 7.00 वाजता खेळवले जातील.

  1. पहिला टी20: 21 जानेवारी – नागपूर
  2. दुसरा टी20: 23 जानेवारी – रायपूर
  3. तिसरा टी20: 25 जानेवारी – गुवाहाटी
  4. चौथा टी20: 28 जानेवारी – विशाखापट्टणम
  5. पाचवा टी20: 31 जानेवारी – तिरुवनंतपुरम

दक्षिण आफ्रिकेतील विजयाचा आत्मविश्वास घेऊन भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरेल. घरच्या मैदानावर भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात काही नवीन खेळाडूंना संधी मिळते की वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – Municipal Election 2025 : मीरा भाईंदरमध्ये महायुतीत ‘मिठाचा खडा’? 50-50 जागांच्या मागणीवर सरनाईक ठाम; भाजपची मात्र वेगळीच रणनीती

Web Title:
संबंधित बातम्या