Home / महाराष्ट्र / Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची वसईत पहिली जाहीर सभा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची वसईत पहिली जाहीर सभा

Eknath Shinde : राज्यातील निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. शिवाय निवडणुकांच्या पार्शवभूमीवर पक्षप्रवेश, आरोप प्रत्यारोपाच्या मालिका...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA


Eknath Shinde : राज्यातील निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. शिवाय निवडणुकांच्या पार्शवभूमीवर पक्षप्रवेश, आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरू आहेत. दरम्यान बड्या राजकीय नेत्याच्या सभांना देखील सुरवात झाली आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबई डोम येते सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला त्या पाठोपाठच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेतली. आणि आता त्यानंतर राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा नारळ शिंदेंच्या शिवसेने आज वसईत फोडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत आज पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामाचे दाखले देत लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाची साद देखील घातली.

शिवसेना-महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेनेने स्वतंत्रपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेने राज्यातील २९ महापालिकेच्या प्रचाराचा नारळ वसईतील सभेत फोडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप महायुतीसोबत एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

आपल्या भाषणात ‘लाडकी बहीण’ योजना गेम चेंजर असल्याचे त्यांनी संगितले. ही योजना कधीच बंद करणार नाही, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले. वसई विरार शहरात क्लस्टर योजना, सॅटिस प्रकल्प, एसआरए योजना सुरू करणार तसेच मुंबईच्या धर्तीवर इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीला इशारा देताना ‘इलाका किसीका भी हो, धमाका हम करेंगे’ असे सांगितले. यावेळी बविआच्या माजी नगरसेविका विमल पाटील आणि केशव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आता या निवडणूक कोणतं नवीन वळण घेणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा – Election 2025 : महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान; नगरपालिकेची मतमोजणीला उद्या सुरवात; किती वाजता सुरु करणार मतमोजणी?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या