Bhagur Election Result 2025 : राज्यात कालच मतदान पार पडले त्यामुळे आता उत्सुकता आहे ती म्हणजे निकालाची. अनेक भागात विजयी उमेदवाराची नावे देखील पुढे येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे भगूर नगरपरिषदेत (Bhagur Nagar Parishad Election Result 2025) मोठा राजकीय उलटफेर देखील पाहायला मिळात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता उध्वस्त केली आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत विजयाचे खाते अखेर उघडले आहे आणि एकूण सात उमेदवारांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.
सध्याच्या मतमोजणीच्या निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण १७ जागांवर अजित पवार गट आणि भाजप, तर ३ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे भगूरच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आगाडीवर असल्याचे दिसून येत होते. पहिल्या काही फेऱ्यांमध्येच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय निश्चित केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार आणि विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा आणि उबाठा युतीच्या नगराध्यक्ष उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी धक्का देत विजयाचा गुलाल उधळला.
तब्ब्ल २५ वर्षांची सत्ता आली संपुष्टात
भगूर नगरपरिषदेत मागच्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्तेत उलटफेर केला आहे. अजित पवार यांच्या विश्वास दाखवत शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा निकाल चर्चेचा विषय बनला आहे.
नाशिक जिल्हा नगरपरिषदेत कोण आहे आघाडीवर?
भगूर – अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांचा विजय
पिंपळगाव बसवंत – भाजपचे डॉ. मनोज बर्डे हे सध्या आघाडीवर आहेत
सिन्नर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले हे देखील आघाडीवर आहेत
ओझर – भाजपच्या अनिता घेगडमल सध्या आघाडीवर आहेत.
त्र्यंबकेश्वर – भाजपचे कैलास घुले आघाडीवर देखील आघाडीवर आहेत.
इगतपुरी – शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत.
हे देखील वाचा – देश सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ! गेल्या 5 वर्षांत 9 लाखांहून अधिक भारतीयांनी नाकारला देशाचा पासपोर्ट









