Haji Mastan Daughter : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने आपल्यावर सतत बलात्कार झाल्याचा खळबळजनक दावा करत तिने सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदत मागितली आहे. आपण अनेक वर्षांपासून न्यायासाठी भटकत असून अजूनही न्याय मिळाला नाही, असे तिने म्हटले आहे.
हाजी मस्तान हा मुंबईतील कुख्यात गुंडांपैकी अंडरवर्ल्ड डॉन होता. पण त्याच्या मुलीचेच लैंगिक शोषण झाले असल्याची गंभीर बाबा आता समोर आली आहे. हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने एका व्हिडिओद्वारे बलात्कार, जबरदस्तीने लग्न, हत्येचा प्रयत्न आणि मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मदतीची मागणी केली आहे.
या संधर्भात तिने अनेक दावे देखील केले आहेत ती म्हणते , १९९६ मध्ये ती अल्पवयीन होती. तेव्हा तिचे तिच्या मामाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्याच माणसाने तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. विशेषतः तिच्या ओळखीचा गैरवापर करत तिची मालमत्ताही देखील त्याने लाटली.
हसीन मस्तान हिने काही वृत्तसंस्थेशी बोलताना सांगते, आरोपी व्यक्तीने माझ्याशी लग्न करण्यापूर्वी ८ वेळा लग्न केले होते. जेव्हा माझ्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा मी अल्पवयीन होते. मला त्यावेळी कोणताच आधार मिळाला नाही. माझ्यावर वारंवार बलात्कार होत राहिला. माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक खुलासा देखील तिने केला. मला बालविवाह करण्यासही भाग पडले गेले. माझी मालमत्तासुद्धा हिसकावून घेण्यात आली. माझी ओळख लपवण्यात आली आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून मी ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा देखील तिने केला. पुढे ती असही म्हणाली कि कायदे कडक असते तर लोक गुन्हे करण्यास घाबरले असते. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कोणतं नवीन वळण घेत हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा –









