Home / लेख / Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता लवकरच जमा होणार; पण अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब, पाहा कारणे

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता लवकरच जमा होणार; पण अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब, पाहा कारणे

Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याबाबत मोठी...

By: Team Navakal
Namo Shetkari Yojana 8th Installment
Social + WhatsApp CTA

Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली करत आहे. मात्र, नव्या नियमांमुळे आणि प्रशासनाने केलेल्या कडक तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर पडले आहेत.

लाखो शेतकऱ्यांचा पत्ता कट; काय आहे कारण?

कृषी विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेनंतर अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता.

मात्र, २१ व्या हप्त्यावेळी हा आकडा 92 ते 93 लाखांवर स्थिरावला आहे. म्हणजेच 4 ते 5 लाख शेतकऱ्यांचा लाभ बंद झाला आहे. नमो शेतकरी योजनेतही हाच पॅटर्न राबवण्यात येत आहे. योजनेतून वगळल्या जाण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • मृत लाभार्थी: तपासणीमध्ये सुमारे 28000 मृत व्यक्तींच्या नावावर लाभ घेतला जात असल्याचे समोर आल्याने ही नावे वगळण्यात आली आहेत.
  • दुहेरी लाभ: एकाच जमिनीच्या सातबाऱ्यावर दोनवेळा लाभ घेणारे सुमारे 35000 लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
  • कुटुंबाचा नवा नियम: रेशन कार्डच्या नियमानुसार, आता एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे एकाच घरातील इतर सदस्यांचे अर्ज रद्द झाले आहेत.
  • आयकर आणि सेवा क्षेत्र: जे शेतकरी आयकर (ITR) भरतात किंवा सरकारी/खाजगी सेवा क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत, त्यांनाही या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे.

८ वा हप्ता कधी जमा होणार?

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, महायुती सरकार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या, तर 1 जानेवारी 2025 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. अद्याप याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, कृषी विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहे.

शेतकऱ्यांनी आपले आधार केवायसी (e-KYC) आणि बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

हे देखील वाचा –  Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या