Home / महाराष्ट्र / Prashant Jagtap Pune : दोन्ही पवार एकत्र येण्याआधीच धक्का! राष्ट्रवादीच्या युतीला बंडाची किनार…

Prashant Jagtap Pune : दोन्ही पवार एकत्र येण्याआधीच धक्का! राष्ट्रवादीच्या युतीला बंडाची किनार…

Prashant Jagtap Pune : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरु असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन...

By: Team Navakal
Prashant Jagtap Pune
Social + WhatsApp CTA

Prashant Jagtap Pune : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरु असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चानां देखील काही दिवसांपासून उधाण आले आहे. या चर्चांना दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत दुजोरासुद्धा दिल्याचे पाहायला मिळते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्यास काही नेते नाखूष असल्याचे देखील चित्र डोळ्यासमोर आहेच. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचं पुढे काय होणार याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या माजी महापौराने दोन दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची घोषणा होणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी यासंभधितील अधिकची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर दत्ता धनकवडे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भात एक मोठं विधान केलं होत.

याबाबत बोलताना दत्ता धनकवडे म्हणाले होते कि, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. याची संपूर्ण चर्चा झाली आहे. आणि आता फक्त घोषणा होणे बाकी आहे. आणि त्या संदर्भातील घोषणा लवकरच होईल. असा दृढ विश्वास देखील त्याने व्यक्त केला आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे यासंदर्भात बोलणे झालेले असून याबाबतची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षातील नेते लवकरच करणार आहेत असे देखील आता बोलले जात आहेत. मात्र जेव्हा पासून युतीच्या चर्चाना उधाण आले आहे तेव्हपासून काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची अस्वस्थता सुरवातीपासूनच दिसत होती. शिवाय त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास स्पष्टपणे कडाडून विरोध केला होता. दरम्यान धनकवडे यांनी देखील प्रशांत जगतापांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात प्रशांत जगताप हे फक्त या शहराचे अध्यक्ष आहेत. मात्र देशाचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवार हेच आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष आहेत.

पुढे ते म्हणतात वरिष्ठ स्तरावर या सगळ्याची चर्चा होऊन निर्णय जाहीर केला जाणार आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची चर्चा सुरु असल्याचे देखील ते म्हणले होते. त्यानुसार घड्याळ या चिन्हावर पुढील निवडणुका लढवल्या जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती देखील त्यांनी दिली होती.

प्रशांत जगताप यांचा आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा –
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास तीव्र विरोध दर्शवत पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र या युतीबाबत निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आधी पासूनच अस्वस्थता होती, आणि आता त्याचे रूपांतर बंडात झाले असल्याचे दिसून आले. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात शरद पवार गटात मोठा धक्का बसल्याचे देखील दिसून आले.

प्रशांत जगताप यांचा सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटासोबत युतीला तीव्र विरोध होता. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास पक्षाला काय फायदा होईल आणि अजितदादांसोबत गेल्यास काय तोटा होईल, या संदर्भातील राजकीय चर्चा देखील केल्या होत्या.

आणि त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः देखील सुरुवातीला दादांच्या गटासोबत न जाण्याचे संकेत दिले होते, मात्र अचानक खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या गटाशी चर्चेचे निर्देश दिल्याने प्रशांत जगताप यांच्यातील नाराजी सरेआम दिसून आली.

अजितदादांसोबत युती केल्यास राजीनामा देईन..

“जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असतील, तर मी पक्षात राहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत जगताप यांनी याआधीच जाहीर केली होती. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या नव्या निर्देशांमुळे प्रशांत जगताप यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. परंतु अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही, तरी जगताप आपल्या भूमिकेवर ठाम अस्लसायचे चित्र आहे.

जगतापाची वाटचाल शिवसेनेच्या (उबाठा) दिशेने :

शरद पवार गटाचा राजीनाम दिल्यानंतर प्रशांत जगताप आता नेमका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचेच लक्ष लागून राहिले आहे. राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार का यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ते येत्या दोन दिवसांत मुंबईत जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अंतिम भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. या भेटीत सुप्रिया सुळे त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात की जगताप मशाल हाती घेतात, याचा फैसला आता होणार त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणूक आता कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा – local bodies election: 57 स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या