Home / महाराष्ट्र / Santosh Deshmukh Case : हो की नाही’पुरतंच बोला! कराडला कोर्टाची तंबी

Santosh Deshmukh Case : हो की नाही’पुरतंच बोला! कराडला कोर्टाची तंबी

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहचली असल्याचे चित्र दिसत आहे....

By: Team Navakal
Santosh Deshmukh Case
Social + WhatsApp CTA

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहचली असल्याचे चित्र दिसत आहे. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज दोन्ही बाजूंमध्ये प्रदीर्घ युक्तिवाद झाला. न्यायालयाने मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सर्व आरोपींना त्यांच्यावर असलेले खून, खंडणी, अपहरण आणि मकोका अंतर्गत असलेले सगळे आरोप वाचून दाखवले. सर्व आरोपींनी हे आरोप अमान्य असल्याचे न्यायाला सांगितले आहे.

सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी खटला लांबवण्यासाठी अनके तांत्रिक मुद्दे यात उपस्थित केले. आरोपी प्रतीक घुले याने शेवटच्या क्षणी वकील बदलले, तर लॅपटॉपमधील डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रती मिळाल्या नसल्याचे शुल्लक कारण पुढे करण्यात आले. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र या सगळ्याला तीव्र विरोध केला. पुढे उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोपींवर आरोप देखील करण्यात आला आहे ते म्हणतात खटला ‘डी फॉर डिले’ आणि ‘डी फॉर डिरेल’ करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

वारंवार वकील बदलणे आणि पुराव्यांच्या प्रतींसाठी वेळ मागण्याच्या प्रकारावर न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “प्रत्येक तारखेला असे व्हायला नको,” असे सुनावत न्यायालयाने आरोपींना आजच डेटा तपासून घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रश्न विचारला की, “तुमच्या विरोधात खंडणी, हत्या आणि संघटित गुन्हेगारीचे जे आरोप आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का?” यावर वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी “आम्हाला आरोप मान्य नाहीत,” असे स्पष्ट उत्तर दिले.

निकमांचे काही महत्त्वाचे मुद्दे
खंडणी मिळण्यात अडथळा निर्माण केला म्हणून संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
आरोपींचा उद्देश गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करून सातत्याने दहशत पसरवणे हाच होता.
प्रत्यक्ष पुराव्याचे काम आता लवकरच सुरू होणार.
८ जानेवारीच्या सुनावणीनंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाणार.

कोर्टात सुनावणी दरम्यान नेमक घडलं काय?
सुनावणीदरम्यान चार नंबरचा आरोपी प्रतीक घुले याच्याकडून अचानक ॲड. बारगजे यांची स्वतंत्र वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवीन वकिलांकडून “मला पुरावे पाहण्यासाठी वेळ हवा,” अशी मागणी करण्यात आली. यावर न्यायालयाने तीव्र शब्दतात नाराजी व्यक्त केली आहे. “खटल्याला आधीच बराच विलंब झाला असून; वारंवार वकील बदलून तीच ती कारणे सातत्याने दिली जात आहेत, हे व्हायला नको,” अशा तीव्र शब्दांत कोर्टाने आरोपींना फटकारले.

आरोपींच्या वकिलांनी याबाबत दावा केला आहे की, “लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीत. जोपर्यंत पुरावा मिळत नाही, तोपर्यंत तो स्वीकारला जाऊ नये.” अशी विनंती केली, यावर उज्वल निकम यांनी स्पष्ट केले की लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “यात खाजगी पुरावे असल्याने त्याचा अगदी सर्रास गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सरसकट डेटा देता येणार नाही.” न्यायालयाने मध्यस्थी करत, डेटा उपलब्ध होताच वकिलांना देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रतीक घुलेच्या वकिलांनी “हा AI चा जमाना आहे, पुराव्यांशी काहीही छेडछाड होऊ शकते, मला अधिक वेळ हवाय,” अशी विनंती केली आहे. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे.

आरोपींना आजच्या आज डेटा तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे, वाल्मीक कराडसह सर्व आरोपींनी आपले वकील बदलण्याची इच्छा व्यक्त केली, जे खटला लांबवण्याचे एक साधन असल्याचे सरकारी पक्षाकडून नमूद करण्यात आले.

कोर्टाने कराडला सुनावलं :
न्यायालयाने सर्व आरोपींना साक्षीत उभे करून त्याच्यावर असलेले गंभीर आरोप वाचून दाखवले. “तुम्ही खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे कृत्य केले आहे, हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” असा सवाल न्यायालयाने विचारला असता; यावर मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने चार वेळेला ‘आरोप अमान्य’ असल्याचे सांगितले. “मला अधिक बोलायचे आहे,” असे म्हणणाऱ्या कराड याला कोर्टाने “फक्त हो किंवा नाही सांगा,” अश्या शब्दांत चांगलेच सुनावले आहे.

हे देखील वाचा – Pune Election 2026 : गुन्हेगारीची सावली की राजकीय ताकद? पुणे निवडणुकीत आंदेकरच्या उमेदवारीवरून वादळ

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या