Home / महाराष्ट्र / Pawar Alliance : दोन गट, दोन मुहूर्त, एकच उद्देश: फक्त सत्ता

Pawar Alliance : दोन गट, दोन मुहूर्त, एकच उद्देश: फक्त सत्ता

Pawar Alliance : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या स्वतःच्या सोईनुसार बदलत्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका...

By: Team Navakal
Pawar Alliance
Social + WhatsApp CTA

Pawar Alliance : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या स्वतःच्या सोईनुसार बदलत्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दृश्य देखील पाहायला मिळत आहे. त्यासाठी, उद्याच दुपारी १२ वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे.

त्यानंतर, आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मुंबईतसाठी ठाकरे तर पुण्यासाठी (Pune) पवार एकत्र आल्याचे चित्र महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळत आहे.

ठाकरेंनंतर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून २६ डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) यांनी दिली आहे. अजित पवार हे २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत, यावर कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी २६ तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितले.

तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, २६ तारखेला याबाबतच्या सर्व गोष्टी समोर येतील. कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, असे आव्हान देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. यासंदर्भाने उद्या अजित पवार मुंबईत आढावा देखील घेणार आहेत.

दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला नसल्यचे दिसले.

पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव आता तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अजित पवारांना याबाबत प्रस्ताव देखील दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या प्रस्तावामुळे पुण्यात अजित पवार महाविकास आघाडीसोबत हि निवडणूक लढवणार का असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

हे देखील वाचा – Thackeray Brothers : मुंबईपासून महाराष्ट्रापर्यंत चर्चेचा भूकंप! ठाकरे बंधू युतीचा मुहूर्त ठरला

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या