Home / महाराष्ट्र / Navneet Rana : महापालिका निवडणुकीत राजकीय गणितात धर्माचा खेळ? नवनीत राणाच ‘ते’ विधान चर्चेत

Navneet Rana : महापालिका निवडणुकीत राजकीय गणितात धर्माचा खेळ? नवनीत राणाच ‘ते’ विधान चर्चेत

Navneet Rana : लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील राजकारणाला धार्मिक रंग दिला जात आसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत...

By: Team Navakal
Navneet Rana
Social + WhatsApp CTA

Navneet Rana : लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील राजकारणाला धार्मिक रंग दिला जात आसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदूंनी किमान तीन,चार मुलं जन्माला घातली पाहिजे, असा सल्लाच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हिंदूंना दिला असून या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर दार सुरु आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी राणा यांनी विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. मौलाना सय्यद कादरी यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘मी सगळ्या हिंदू लोकांना विनंती करते की, जर ते खुल्यापणाने सांगत असतील की, ४ बायका आणि १९ मुलं आहेत. तर किमान तीन- तीन, चार-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार हा हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचा आहे. ते मोठ्या संख्येने बाळ जन्माला घालत आहे. तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहायचं? आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत. यामध्ये कुठलंच दुमत नाही’.

शिवाय नवनीत राणांनी शरद पवारांन बाबतही दावे केले आहेत. ‘शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत आणि अजित पवार हे शरद पवार यांच्या कुटुंबातील आहे. अजित पवार यांनी उघडपणे सांगितलं होतं की, मला भाजपसोबत जायला शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे दोन पवार एकत्र होत असेल तर आनंदच आहे.

नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरेंवरही जोरदार टीका केली. ‘मजबुरीचं नाव जनाब उद्धव ठाकरे झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे. नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बाहेर देखील निघाले नाही. त्यांच्यासोबत कोणीही आलं तरी, त्यांची परिस्थिती महाराष्ट्रात नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीपेक्षा देखील बेकार परिस्थिती त्यांची आता पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे. महापालिकेवर भगवा आणि कमळचा झेंडा लागणार आहे, असा विश्वास देखील राणा यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा – Chicken Curries : हिवाळ्यातील उबदार जेवण: चिकन करीच्या सात आवडत्या रेसिपी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या