एअरटेल-जिओ-व्हीआयने लाँच केले नवीन रिचार्ज प्लॅन्स, जाणून घ्या कोणती कंपनी देतेय कमी किंमतीत जास्त फायदे

New Recharge Plans 2025: टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्हीआयने ग्राहकांसाठी नवीन कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन्स लाँच केले आहेत. या नवीन प्लॅन्समध्ये कंपन्यांनी इंटरनेटची सुविधा दिलेली नाही. ट्रायच्या नवीन नियमानुसार हे प्लॅन लाँच करण्यात आलेले आहेत. कंपन्यांच्या या रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेऊयात.

एअरटेलचे  नवीन रिचार्ज प्लॅन्स (Airtel Recharge Plans)

एअरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन – 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 900 मोफत एसएमएस दिले जातात. याशिवाय, 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि फ्री हेलो ट्यून सेवा देखील मिळेल.

एअरटेलचा 1,959 रुपयांचा प्लॅन – एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, 3600 मोफत एसएमएस, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि फ्री हेलो ट्यूनचा फायदा मिळेल.

जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन्स (Jio Recharge Plans)

जिओचा 458 रुपयांचा प्लॅन – जिओच्या या प्लॅनची मुदत 84 दिवस आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 1000 एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या अ‍ॅप्सचा फायदा मिळेल.

जिओचा 1958 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 3600 एसएमएस आणि  जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो.

व्हीआयचा नवीन रिचार्ज प्लॅन्स (Vi Recharge Plans)

व्हीआयचा 1460 रुपयांचा प्लॅन – व्हीआयच्या 1460 रुपयांच्या प्लॅनची वैधता 270 दिवस आहे. या 270 दिवसांसाठी ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दिले जातात. याशिवाय, कोणतेही अतिरिक्त फायदे यात मिळत नाही. लक्षात घ्या की हे सर्व प्रीपेड प्लॅन्स असून, यामध्ये डेटाची सुविधा मिळत नाही.