‘हे’ आहेत सर्वात बेस्ट ब्रॉडबँड प्लॅन्स, 1024Mbps च्या स्पीडने वापरा इंटरनेट, मिनिटात डाउनलोड होईल चित्रपट

Palette Creation
+91 9930666001

———- Forwarded message ———
From: officialmarathiwriter <officialmarathiwriter@gmail.com>
Date: Sun, 2 Feb 2025 at 6:44 PM
Subject: Navakal Articles- 2/2/2025
To: <palettec.ind@gmail.com>
Cc: Raamesh Gowri Raghavan <iambecomedeath@gmail.com>, <rohit@navakal.in>

1. ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट ब्रॉडबँड प्लॅन्स, 1024Mbps च्या स्पीडने वापरा इंटरनेट, मिनिटात डाउनलोड होईल चित्रपट

Best Broadband Plans:  तुम्ही जर हाय-स्पीड इंटरनेटसह येणारे प्लॅन्स शोधत असाल तर एअरटेलकडे असे अनेक चांगले पर्याय आहेत. प्रामुख्याने तुम्ही जर घरून काम करत असाल अथवा विद्यार्थी असाल तर एअरटेल ब्लॅक पोर्टफोलिओमध्ये काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

एअरटेलकडे तीन शानदार ब्रॉडबँड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला 1024Mbps पर्यंत स्पीड आणि अनलिमिटेड डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

एअरटेलचा 699 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 40Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. यामध्ये अनलिमिटेड डेटाची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, 350 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनेल्स मोफत मिळतात. तसेच, Disney+ Hotstar आणि Airtel Xstream App चा अ‍ॅक्सेसदेखील दिला जातो.

एअरटेलचा 1599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये 300Mbps पर्यंतच्या इंटरनेट स्पीडसह अनलिमिटेड डेटा दिला जातो. याशिवाय, रुपये 300 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनेल्स मोफत मिळतात. यात Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Airtel Xstream App चे ही मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

एअरटेलचा 3999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि Airtel Xstream App चे ही मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यासोबतच, 350 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनल्सही मोफत पाहता येतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये 1024Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळतो.