9-carat Gold Hallmarking: भारतात सोने हे केवळ गुंतणुकीचे माध्यम नाही. भारतात सणांपासून ते घरातील खास कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी केले जाते. मात्र, सोन्याच्या (gold) किमतींनी विक्रमी उच्चांक गाठल्यामुळे ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
सोन्याच्या किंमतीत प्रंचड वाढ झाल्याने भारतात सोन्याच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.
यावर उपाय म्हणून भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने 9 कॅरेट सोन्याला अधिकृतपणे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या हॉलमार्किंग प्रणालीमध्ये समाविष्ट केले आहे. याचा अर्थ, आता 9 कॅरेट सोन्यालाही 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याप्रमाणेच अधिकृत ओळख मिळाली आहे.
9 कॅरेट सोने म्हणजे काय? (9-carat Gold Hallmarking)
- शुद्धता: 9 कॅरेट सोन्यामध्ये 37.5 टक्के शुद्ध सोने असते. उर्वरित 62.5 टक्के मिश्रधातू जसे की तांबे, चांदी किंवा जस्त असतात.
- किंमत: सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तर 9 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 37,000 प्रति 10 ग्रॅम आहे.
- फायदे: हे सोने स्वस्त असल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात येते. तसेच, यात इतर धातूंचे मिश्रण असल्यामुळे ते अधिक टिकाऊ असते, त्यामुळे रोजच्या वापरातील दागिने, जसे की अंगठ्या, बनवण्यासाठी ते उत्तम आहे.
हॉलमार्क असलेले सोन्याचे प्रकार:
सध्या बीआयएसच्या अधिकृत यादीत 9K, 14K, 18K, 20K, 22K, 23K आणि 24K या सोन्याच्या शुद्धतेच्या श्रेणींचा समावेश आहे.
सोन्याच्या मागणीला चालना
रक्षाबंधनपासून सुरू होणाऱ्या आणि दिवाळीपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे, सरकारने 9 कॅरेट सोन्याला हॉलमार्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कमी बजेटमध्येही ग्राहकांना हॉलमार्क असलेले सोने खरेदी करता येईल.
हे देखील वाचा –
PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक