Acer ने भारतात लाँच केला खूपच स्वस्त लॅपटॉप, 15 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी

प्रसिद्ध ब्रँड एसर (Acer) अवघ्या 15 हजार रुपयांच्या बजेटमधील लॅपटॉप लाँच केला आहे. कंपनीने Acer Aspire 3 (2025) लॅपटॉप लाँच केला असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे अनेक महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा डिस्प्ले आणि 8GB DDR4 रॅम दिली आहे.

Acer Aspire 3 (2025) ची किंमत

भारतात Acer Aspire 3 (2025) ची किंमत 15,990 रुपयांपासून सुरू होते. सध्या लिमिटेड सेल पिरियडअंतर्गत हा लॅपटॉप 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा लॅपटॉप – 128GB, 256GB आणि 512GB मध्ये या तीन स्टोरेज वेरिएंट्स उपलब्ध आहे. लॅपटॉपची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच, यासोबत एक वर्षाची कॅरी-इन स्टँडर्ड वॉरंटी दिली जाते.

Acer Aspire 3 (2025) चे स्पेसिफिकेशन्स

Acer Aspire 3 (2025) मध्ये 11.6 इंचाचा HD Acer ComfyView LED बॅकलिट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे युजर्सला क्लिअर व्हिज्युअल्स मिळतील. तसेच, हा डिस्प्ले डोळ्यांसाठीही सुरक्षित आहे. लॅपटॉपमध्ये Intel Celeron N4500 प्रोसेसरसह येतो. यासोबत,  HD ग्राफिक्स देण्यात आले आहे. यामध्ये 8GB DDR4 RAM देण्यात मिळेल, जी 16GB पर्यंत अपग्रेड करता येते.

लॅपटॉपच्या टॉप मॉडेलमध्ये 1TB PCIe NVMe SSD आहे. पॉवर बॅकअपसाठी 38Wh Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, 720p HD वेबकॅम दिला असून, यामुळे ऑनलाईन क्लासेस अटेंड करणे सोपे होईल.

Acer Aspire 3 (2025) मध्ये अनेक कनेक्टिव्हिटी USB 3.2 Gen पोर्ट, Type-C पोर्ट, HDMI पोर्ट, आणि SD कार्ड रीडर सारखे फीचर्स दिले आहेत. हा लॅपटॉप केवळ 16.8mm स्लिम असून याचे वजन 1 किलो आहे. ज्यामुळे तुम्ही कोठेही सहज घेऊन जाऊ शकता.