Home / arthmitra / GST मधील बदलांमुळे कोणत्या कार व बाईक स्वस्त होणार? जाणून घ्या

GST मधील बदलांमुळे कोणत्या कार व बाईक स्वस्त होणार? जाणून घ्या

GST on Cars-Bikes

GST on Cars-Bikes: GST परिषदेने ऑटोमोबाईलवरील करप्रणालीत मोठे बदल करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कार आणि दुचाकींच्या किमतींवर थेट परिणाम होणार आहे.

22 सप्टेंबरपासून, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, ही सुधारित करप्रणाली लागू होईल. याचा सर्वात मोठा फायदा लहान कार आणि दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.

नवीन कर स्लॅब आणि नियम

नवीन व्यवस्थेनुसार, कर स्लॅब्स सोप्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वाहनांच्या किमतीत बदल होईल.

  • 18% GST: 1,200 cc पेक्षा कमी क्षमतेच्या पेट्रोल, LPG आणि CNG कार तसेच 1,500 cc पेक्षा कमी डिझेल कार आणि 4,000 mm पेक्षा कमी लांबीच्या वाहनांवर आता 28% ऐवजी 18% जीएसटी लागेल.
  • 40% GST: 1,200 cc पेक्षा जास्त पेट्रोल, 1,500 cc पेक्षा जास्त डिझेल आणि 4,000 mm पेक्षा जास्त लांबीच्या सर्व मोठ्या कारवर आता थेट 40% जीएसटी लागेल.

कोणती वाहने होणार स्वस्त?

या निर्णयानंतर अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती कमी होणार आहेत.

  • छोट्या कार: मारुती स्विफ्ट, वॅगनआर, ह्युंदाई आय 20, टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz), रेनॉ क्विड (Renault Kwid) आणि ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) यांसारख्या मॉडेल्सच्या किमती घटतील.
  • दुचाकी: 350 cc पर्यंतच्या कम्युटर बाइक्स स्वस्त होतील. यात हिरो स्प्लेंडर (Hero Splendor), होंडा शाईन (Honda Shine), टीव्हीएस अपाचे (TVS Apache), बजाज पल्सर (Bajaj Pulsar) तसेच रॉयल एनफिल्ड क्लासिक आणि हंटर 350 मॉडेल्सचा समावेश आहे.
  • व्यावसायिक वाहने: तीनचाकी, बस, ट्रक आणि रुग्णवाहिकांवरही आता 28% ऐवजी 18% जीएसटी आकारला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांवरील 5% चा सर्वात कमी स्लॅब कायम राहील.

या गाड्या होणार महाग

मोठ्या आणि प्रीमियम गाड्यांसाठी मात्र हा निर्णय निराशाजनक ठरू शकतो.

  • मोठ्या कार: ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), टाटा हॅरिअर, महिंद्रा एक्सयूव्ही 700 आणि टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हीवर आता 40% जीएसटी लागेल.
  • मोठ्या दुचाकी: 350 cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक्सवरही 40% कर लागेल, ज्यामुळे रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 , केटीएम ड्यूक 390 आणि हार्ले-डेव्हिडसन X440 सारख्या मॉडेल्सच्या किमती वाढतील.

यापूर्वी मोठ्या गाड्यांवर 28% जीएसटी आणि सुमारे 22% उपकर (cess) लागत होता, ज्यामुळे एकूण कर 50% पर्यंत जात होता. नवीन 40% च्या फ्लॅट दरमुळे उपकर रद्द होईल, ज्यामुळे करप्रणाली सोपी आणि पारदर्शक बनेल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

UPI व्यवहाराची मर्यादा वाढली; 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार, ‘या’ क्षेत्रांना मिळणार मोठा फायदा

जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी

 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल