Home / arthmitra / जीएसटीमध्ये मोठे बदल होणार; फक्त 5% आणि 18% टॅक्स दर ठेवण्याचा प्रस्ताव

जीएसटीमध्ये मोठे बदल होणार; फक्त 5% आणि 18% टॅक्स दर ठेवण्याचा प्रस्ताव

GST Tax Slabs

GST Tax Slabs: भारतातील वस्तू आणि सेवा कराच्या (GST) रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने 5% आणि 18% असे दोनच जीएसटी दर ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचाच अर्थ, सध्याचे 12% आणि 28% चे टॅक्स स्लॅबरद्द केले जातील. याचा उद्देश करप्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शकबनवणे आहे.

रिपोर्टनुसार, जीएसटीच्या या नवीन रचनेत सध्या 12% टॅक्स स्लॅबमध्ये असलेल्या 99% वस्तू 5% च्या स्लॅबमध्ये आणल्या जातील. 28% च्या स्लॅबमध्ये असलेल्या सुमारे 90% वस्तू 18% च्या स्लॅबमध्ये येतील.

अर्थ मंत्रालयाने 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त याची घोषणा केली आहे. सरकारने ‘मानक आणि गुणवत्ता’ अशा दोन दरांची शिफारस केली आहे, ज्यात काही निवडक वस्तूंसाठी विशेष कर दरही असतील.

तंबाखू उत्पादनांवर 40% टॅक्स

नवीन प्रस्तावित बदलानुसार, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर 40% कर लावला जाईल. याशिवाय, ‘सिन गुड्स’ आणि लक्झरी वस्तूंवरही 40% कर आकारला जाईल. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसारख्या पेट्रोलियम उत्पादनांना सध्याच्या जीएसटी प्रणालीतून वगळण्यात आले आहे.

या बदलांमुळे महसूलातहोणारे संभाव्य नुकसान भरून काढले जाईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. या प्रस्तावावर जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत चर्चा केली जाईल आणि यावर लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.