Bank Minimum Balance Rules: आयसीआयसीआय बँके (ICICI Bank) पाठोपाठ आता एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) देखील आपल्या बचत खातेधारकांना (Bank Minimum Balance Rules) मोठा धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने आता बचत खात्यावर किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवण्याची मर्यादा वाढवून 25,000 रुपये केली आहे.
हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू झाला आहे. जर खात्यात ही किमान शिल्लक राखली नाही, तर बँक शुल्क आकारू शकते.
यापूर्वी शहरी भागातील एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यासाठी किमान शिल्लक मर्यादा 10,000 रुपये होती, ती आता थेट 25,000 रुपये करण्यात आली आहे.
ICICI बँकेनेही वाढवली मर्यादा
एकीकडे सरकारी बँका (Government Banks) बचत खात्यावरील किमान शिल्लक ठेवण्याचा नियम शिथिल करत असताना, खासगी बँका मात्र यात वाढ करत आहेत. नुकतेच आयसीआयसीआय बँकेनेही बचत खात्याच्या नियमांमध्ये आणि काही सेवा शुल्कांमध्ये मोठे बदल केले आहेत.
आयसीआयसीआय बँकेत 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना आता किमान 10,000 ऐवजी 50,000 रुपये किमान शिल्लक ठेवावी लागेल. हा नियम फक्त मेट्रो आणि शहरी भागातील नवीन खात्यांसाठी आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या बदललेल्या नियमांनुसार:
मेट्रो आणि शहरी शाखा: किमान मासिक सरासरी शिल्लक10,000 वरून वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे.
निम-शहरी ृशाखा: ही मर्यादा 5,000 रुपयांवरून वाढवून 25,000 रुपये करण्यात आली आहे.
ग्रामीण शाखा: ही मर्यादा 5,000 रुपयांवरून वाढवून 10,000 रुपये करण्यात आली आहे.
हे नवे नियम फक्त 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडल्या गेलेल्या नवीन खात्यांवर लागू होतील. जुन्या खातेधारकांसाठीसध्याचे नियम कायम राहतील. पगार खाते (Salary Account) आणि ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट’ (BSBDA), जे शून्य शिल्लक (Zero-Balance) खाते असतात, त्यांच्यावर या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही.