Home / arthmitra / जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित

जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित

GST on Insurance

GST on Insurance: जीएसटी परिषदेच्या बैठकीत विमाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील GST पूर्णपणे रद्द केला आहे. हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, या निर्णयामुळे आता विमा खरेदी करणे अधिक सोपे आणि स्वस्त होणार आहे.

यापूर्वी या पॉलिसींवर 18% GST आकारला जात होता. उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने 1,000 रुपयांचा विमा प्रीमियम भरला, तर त्याला 180 रुपये GST म्हणून अतिरिक्त रक्कम भरावी लागत होती. यामुळे अनेकदा विमा सामान्यांसाठी परवडणारा नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून विम्याला सामान्यांसाठी स्वस्त बनवण्यासाठी GST रद्द करण्याची मागणी केली जात होती, जी आता पूर्ण झाली आहे.

ग्राहकांना नेमका किती फायदा होणार?

आता ULIP, टर्म प्लॅन, आणि फॅमिली फ्लोटर यांसारख्या वैयक्तिक विमा योजना GST-मुक्त झाल्या आहेत.

उदा. प्रीमियम 1,000 रुपये

पूर्वीची किंमत: 1,000 रुपये (प्रीमियम) + 180 रुपये (GST) = 1,180 रुपये

नवीन किंमत: 1,000 रुपये (प्रीमियम) + 0 रुपये (GST) = 1,000 रुपये

यामुळे ग्राहकांना थेट 180 रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र, तज्ञांच्या मते, विमा कंपन्यांना ऑफिसचे भाडे, मार्केटिंग, आणि एजंट्सचे कमिशन यांसारख्या खर्चांवर जो GST भरावा लागतो (याला ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ ITC म्हणतात), तो त्यांना आता मिळणार नाही.

त्यामुळे काही कंपन्या तो खर्च ग्राहकांकडून वसूल करू शकतात. त्यामुळे 1,000 रुपयांची पॉलिसी सुमारे 1,126 ते 1,127 रुपयांपर्यंत मिळू शकते. असे असले तरी, ग्राहकांना पूर्वीपेक्षा निश्चितच मोठा फायदा होणार आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत?

देशातील सर्वोत्तम कॉलेज कोणते? पाहा NIRF रँकिंग 2025 ची संपूर्ण यादी