Home / arthmitra / ग्राहकांच्या दबावानंतर ICICI बँकेचा मोठा निर्णय; बचत खात्यातील मिनिमम बॅलेन्सची मर्यादा केली कमी

ग्राहकांच्या दबावानंतर ICICI बँकेचा मोठा निर्णय; बचत खात्यातील मिनिमम बॅलेन्सची मर्यादा केली कमी

ICICI Bank Minimum Balance Rules

ICICI Bank Minimum Balance Rules: आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आपल्या नवीन ग्राहकांसाठी बचत खात्यातील किमान शिल्लक (ICICI Bank Minimum Balance Rules) ठेवण्याच्या नियमांमध्ये पुन्हा बदल केला आहे. ग्राहकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर बँकेने मेट्रो आणि शहरी भागातील नवीन ग्राहकांसाठी किमान शिल्लक मर्यादा 50,000 रुपयांवरून कमी करून 15,000 रुपये केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बँकेने ही मर्यादा 10,000 रुपयांवरून थेट 50,000 रुपयांपर्यंत वाढवली होती, ज्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. ही वाढ अजूनही जुन्या नियमांपेक्षा 5,000 रुपयांने जास्त आहे, पण 50,000 रुपयांच्या तुलनेत ही एक मोठी सूट मानली जात आहे.

निम-शहरी भागासाठीही मर्यादा घटली

बँकेने निम-शहरी भागातील नवीन ग्राहकांसाठीही किमान शिल्लक मर्यादा 25,000 रुपयांवरून कमी करून 7,500 रुपये केली आहे. मात्र, जुन्या ग्राहकांसाठी ग्रामीण आणि निम-शहरी भागातील ही मर्यादा 5,000 रुपये कायम ठेवण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेने अचानक मिनिमम बॅलेन्सची मर्यादा वाढवल्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली होती. एकीकडे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) तर 2020 मध्येच किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. इतर बहुतेक बँकांनी देखील किमान रक्कमेची मर्यादा घटवली आहे. त्यात आयसीआयसीआय आणि एचडीएफसी सारख्या बँकेने मर्यादा वाढवल्याने बँक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.