Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Yojana) सातवा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या हप्त्याअंतर्गत राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.
तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, मात्र पैसे आले नसल्यास सोप्या पद्धतीने याबाबत माहिती जाणून घेऊ शकता.
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. याचसोबत केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) सुद्धा सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये प्रतिवर्ष अनुदान मिळते.
याआधी या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आतापर्यंत 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹11,130 कोटींची मदत मिळाली आहे.
Namo Shetkari Yojana: खात्यात पैसे आले की नाही, कसे तपासाल?
जर तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही खालील पद्धतींनी स्टेटस तपासू शकता:
पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून SMS येईल. तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन किंवा बँकेत पासबुकमध्ये नोंद करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती तपासू शकता.
ऑनलाईन पद्धत:
- सर्वात आधी NSMNY (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्य पृष्ठावर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
- OTP टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ‘Beneficiary Status’ दिसेल.
- जर येथे ‘Eligibility Details’ हा पर्याय दिसला तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात. ‘Ineligibility’ दिसल्यास तुम्ही अपात्र आहात.
Namo Shetkari Yojana: पैसे जमा न झाल्यास काय करावे?
जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन पीएम किसान योजनेच्या कक्षाला भेट देऊ शकता. तेथील अधिकारी तुमची तक्रार नोंदवून घेतील आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगतील.
हे देखील वाचा –
अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक भाजपा एनडीएनंच जिंकली, पण धनखडांवेळचं मताधिक्य घटलं!