September Rule Changes: सप्टेंबर महिना सुरू होताच अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या (September New Rules) खिशावर आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.
यामध्ये LPG सिलेंडरचे दर, क्रेडिट कार्डचे नियम, आधार कार्ड अपडेट आणि आयकर रिटर्न (ITR) सारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
वेळेत हे बदल जाणून घेणे आणि त्यानुसार आवश्यक कामे पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग, या सप्टेंबरमध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल होत आहेत ते सविस्तर पाहूया.
सप्टेंबर 2025 पासून लागू होणारे 8 मोठे बदल (September Rule Changes)
NPS मधून UPS मध्ये स्विच करण्याचा अंतिम दिवस: सरकार कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेच्या (UPS) धर्तीवर नवीन योजना घेऊन आली आहे. जर तुम्हाला नवीन योजना निवडायची असेल, तर यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
LPG सिलेंडरचे नवे दर: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होतो. या महिन्यात कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
SBI क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्स: 1 सप्टेंबरपासून SBI क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट्स मध्ये बदल झाला आहे. डिजिटल गेमिंग, सरकारी वेबसाइट्स आणि काही विशिष्ट व्यापाऱ्यांवरील व्यवहारांसाठी आता रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाहीत.
इंडिया पोस्टचे नवीन नियम: 1 सप्टेंबरपासून इंडिया पोस्टने ‘रजिस्टर्ड पोस्ट’ ही सेवा ‘स्पीड पोस्ट’मध्ये विलीन केली आहे. यामुळे आता सर्व नोंदणीकृत मेलची डिलिव्हरी स्पीड पोस्टद्वारेच केली जाईल, ज्यामुळे ती अधिक जलद आणि सोपी होईल.
चांदीच्या दागिन्यांसाठी नवीन नियम: 1 सप्टेंबरपासून चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू झाला आहे. आता ग्राहक हॉलमार्क्ड आणि नॉन-हॉलमार्क्ड असे दोन्ही प्रकारचे दागिने खरेदी करू शकतात. सध्या हा नियम ऐच्छिक आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी: UIDAI ने नागरिकांसाठी मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अशी कोणतीही माहिती मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर अपडेट केल्यास शुल्क लागेल.
ITR फाइलिंगची शेवटची तारीख: जे लोक आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्यास विसरले आहेत, त्यांच्यासाठी विलंब शुल्कासह ITR भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला जास्त दंड भरावा लागू शकतो.
बँकांच्या FD योजनांमध्ये बदल: इंडियन बँक (Indian Bank) आणि IDBI बँक (IDBI Bank) यांसारख्या काही बँकांनी सुरू केलेल्या विशेष मुदत ठेव (Fixed Deposit) योजनांची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. चांगला व्याजदर मिळवण्यासाठी या तारखेपूर्वी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
राज ठाकरे कुचक्या कानाचे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल
खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप