Home / देश-विदेश / अमेरिकेसोबत अणुकरार करा! नाहीतर इस्त्रायल हल्ला करेल! अमेरिकेची इराणला धमकी

अमेरिकेसोबत अणुकरार करा! नाहीतर इस्त्रायल हल्ला करेल! अमेरिकेची इराणला धमकी

दुबई- सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री यांनी गेल्या महिन्यात इराणमधील नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अणुकराराच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दुबई- सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री यांनी गेल्या महिन्यात इराणमधील नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अणुकराराच्या वाटाघाटींचा प्रस्ताव गांभीर्याने घ्या. नाहीतर इस्त्रायली हल्ल्याचा धोका पत्करा, अशी थेट धमकीच दिल्याचे उघड झाले आहे.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर ड्रोन हल्लेही केले आहेत. या भागात अस्थिरता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबियाचे 89 वर्षांचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी आपला मुलगा प्रिन्स खालिद बिन सलमान याला इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासाठी निरोप घेऊन पाठवले. 17 एप्रिल रोजी इराणच्या राष्ट्रपती निवासस्थानी पार पडलेल्या बंद दरवाजामागील या बैठकीला इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन, संरक्षण दलांचे प्रमुख मोहम्मद बघेरी आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हे उपस्थित होते, अशी सूत्रांनी माहिती दिली. त्यावेळी झालेल्या या बैठकीत खालिद बिन सलमान यांनी कोणता गोपनीय निरोप इराणच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला याचा तपशील आता उघड झाला आहे. प्रिन्स खालिद हे जे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेतील सौदीचे राजदूत होते. त्यांनी इराणला इशारा दिला की, अमेरिका दीर्घकाळ चालणाऱ्या वाटाघाटींना फारसा वेळ देऊ शकणार नाही. ट्रम्प प्रशासनाला लवकर निर्णय हवा आहे. तसे झाले नाही तर संवाद व राजनैतिक मार्ग बंद होतील.
ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते की, इराणच्या अणु कार्यक्रमावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्याबदल्यात इराणवरील निर्बंधात सवलती देण्यासाठी त्यांनी थेट चर्चा सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे, इराणच्या अणुस्थळांवर हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा मिळावा, यासाठी वॉशिंग्टनमध्ये आलेले इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केले होते.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या