Home / देश-विदेश / अयोध्येतील मंदिर कळस! सोन्याचा मुलामा दिला

अयोध्येतील मंदिर कळस! सोन्याचा मुलामा दिला

अयोध्या- अयोध्येतील राम मंदिर कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र संस्थेने मंदिराच्या भव्य आणि चमकदार सोन्याने...

By: E-Paper Navakal

अयोध्या- अयोध्येतील राम मंदिर कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र संस्थेने मंदिराच्या भव्य आणि चमकदार सोन्याने मढवलेल्या कळसाचे फोटो प्रसिद्ध केले. 5 जून रोजी मंदिरात राम दरबार स्थापन होणार आहे. त्यासाठी उद्या 3 जून पासून विधी सुरू होतील. यामध्ये मंदिरात राम दरबारासह 7 मंदिरांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी अयोध्या आणि काशीतील 101 विद्वान या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित केले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी आज महिलांकडून शरयू जल कलश यात्रा काढली होती. उद्या सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास सर्व मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना सुरू होऊन रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. यादरम्यान दुपारी 1 तास विश्रांती असेल. त्याचप्रमाणे 4 जून रोजीही विशेष प्रार्थना केल्या जातील. त्यानंतर 5 जून रोजी सकाळी 5.30 वाजता पूजा सुरू होईल. 11 वाजता शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होईल. यामध्ये भगवान सूर्य, गणेश, हनुमान, शिव, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय, सप्त मंडपात महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वशिष्ठ, निषादराज, अहिल्या आणि शबरी यांच्या मूर्ती बसवल्या आहेत.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या