Home / देश-विदेश / ऑस्ट्रेलियात पोलिसाची दांडगाई ; भारतीय व्यक्ती कोमात गेला

ऑस्ट्रेलियात पोलिसाची दांडगाई ; भारतीय व्यक्ती कोमात गेला

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी नागरिकांना पोलिसांकडून काहीवेळा क्रूर वागणूक दिली जाते याचे संतापजनक उदाहरण समोर आले आहे. येथे एका भारतीय...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


कॅनबेरा – ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी नागरिकांना पोलिसांकडून काहीवेळा क्रूर वागणूक दिली जाते याचे संतापजनक उदाहरण समोर आले आहे. येथे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करताना पोलीस कर्मचारी त्याला रस्तावर पालथा घालून त्याच्या मानेवर गुडघे टेकवून बसला. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मेंदुला गंभीर इजा झाली आणि तो कोमामध्ये गेला.
गौरव कुंडी (42) असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करताना पोलिसांनी केलेल्या दांडगाईचा व्हिडिओ त्याच्या पत्नीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत गौरव आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असे पोलिसांना सांगताना दिसत आहे. हा सर्व प्रकार घडत असताना त्याची पत्नी अमृतपाल कौर लोकांकडे गौरवला सोडवण्यासाठी मदतीची याचना करताना दिसते.
२०२० मध्ये अमेरिकेच्या मिनिओपलीसमध्ये अमेरिकन पोलिसांच्या दांडगाईमुळे जॉर्ज फ्लॉईड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या