Home / देश-विदेश / क्रुझर गाडी ट्रकवर आदळली दोघांचा मृत्यू! १२ जखमी

क्रुझर गाडी ट्रकवर आदळली दोघांचा मृत्यू! १२ जखमी

अहमदनगर- अहमदनगर मधील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात क्रुझर गाडी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात क्रुझर गाडीमधील दोन जणांचा मृत्यू...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

अहमदनगर- अहमदनगर मधील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात क्रुझर गाडी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात क्रुझर गाडीमधील दोन जणांचा मृत्यू झाला, तर इतर एक शिक्षक आणि ११ जण जखमी झाले आहेत. प्रथमेश तेली आणि वृषभ सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. यातील प्रथमेशचा जागीच मृत्यू झाला तर, वृषभ याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

ही १३ मुले जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकादमीतील असून ती (एमपीएल) क्रिकेट सामना पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेली होती. बोदवडकडे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत आज पहाटे ५:१५ च्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकवर पाठीमागून धडक दिली. या धडकेत क्रुझर गाडीमधील सर्वजण जखमी झाले. तर एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस कर्मचारी तत्काळ हजर झाले. त्यांनी जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. यामध्ये अकादमीचे एक शिक्षकही जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचे सांगितले जाते.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या