Home / देश-विदेश / तहव्वूर राणाला एकदाच फोन करण्याची परवानगी

तहव्वूर राणाला एकदाच फोन करण्याची परवानगी

नवी दिल्ली- मुंबईवर २६ -११ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक आरोपी तहव्वूर राणाला केवळ एकदाच कुटुंबियांशी फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


नवी दिल्ली-
मुंबईवर २६ -११ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक आरोपी तहव्वूर राणाला केवळ एकदाच कुटुंबियांशी फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीच्या पातियाळा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंग यांनी ही परवानगी दिली आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हा फोन तिहार कारागृह प्रशासनाच्या देखरेखीखाली होईल त्याचप्रमाणे कारागृहाच्या फोन करण्याच्या प्रक्रियेनुसारच होईल. या फोन नंतर कारागृह प्रशासनाने त्याचा एक सविस्तर अहवाल न्यायालयाला सादर करावे. यामध्ये त्याला नियमितपणे फोन करु द्यावा की नाही या बद्दलचे निश्चित मत द्यावे.
मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी राणाने या कटाचा मास्टरमाईंड डेविड हेडली याला मदत केली होती. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्याला भारतात आणण्यात आले असून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. आपल्या कुटुंबियांशी फोनवरुन बोलू देण्याची याचिका त्याने दिल्लीच्या पातियाळा न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने आजपासून दहा दिवसाच्या आत त्याला केवळ एकदाच कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी दिली.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या