वॉशिंग्टन- अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या अलिया सीएक्स 300 या पहिल्या पूर्णपणे ईलेक्ट्रिक प्रवासी विमानाची चाचणी यशस्वी झाली. या विमानाने पूर्व हम्प्टन येथून न्युयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळापर्यंत प्रवास उड्डाण अवघ्या 35 मिनिटांत पूर्ण केले. 1300 किलोमीटरचे अंतर या विमानाने अवघ्या 8 डॉलर (694 रुपये) खर्चामध्ये पार केले. पारंपरिक हेलिकॉप्टरने याच मार्गासाठी 13,885 रुपये खर्च येतो.
बीटा टेक्नॉलॉजीजने प्रवाशांसह यशस्वीरित्या उड्डाण करणारे पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान बनवले आहे. इलेक्ट्रिक विमानांच्या उड्डाणामधील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. हे विमान एकदा चार्ज केले की तब्बल 250 नॉटिकल माईल्स म्हणजे जवळपास 460 किमी अंतर पार करू शकते. यामुळे भविष्यात हवाई प्रवास अधिक स्वस्त, प्रदूषणमुक्त आणि सुलभ होणार आहे. बीटा टेक्नॉलॉजीज ही अमेरिकन कंपनी असून तिची स्थापना 2017 मध्ये काईल क्लार्क यांनी केली आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक विमानांचे उत्पादन आणि व्यावसायीकरण यासाठी निधीची तरतूद केली आहे. अलिया सीएक्स 300 साठी कंपनी 2025 अखेरपर्यंत फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनची अधिकृत मान्यता मिळवण्याच्या तयारीत आहे.
बीटा टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ काईल क्लार्क यांनी सांगितले की, हे 100 टक्के इलेक्ट्रिक विमान आहे. यामध्ये प्रवास करताना आवाजाचा त्रास होत नाही. प्रवासी एकमेकांशी निवांत संवाद साधू शकतात. चार्जिंगचा खर्च फक्त 8 डॉलर (भारतीय चलनानुसार 694 रुपये )आला.अर्थात, तुम्हाला पायलट आणि विमानाचा खर्च करावा लागेल.
